नागपूर - सुयोग नगर येथे रेती वाहतूक करणाऱ्या टिप्पर (ट्रक) चालकाने निष्काळजीपणे टिप्पर चालवल्याने झालेल्या भीषण अपघातात एक महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. सरिता कापसे असे मृत महिलेचे नाव असून, ती तिच्या दुचाकीने घरी जात असताना हा अपघात घडला. दरम्यान, पोलिसांनी ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे.
मानेवाडा रिंग रोडवर भरधाव टिप्परने महिलेला चिरडले, ट्रक चालकाला पोलिसांकडून अटक - Manewada Ring Road
नागपूर - सुयोग नगर येथे रेती वाहतूक करणाऱ्या टिप्पर (ट्रक) चालकाने निष्काळजीपणे टिप्पर चालवल्याने झालेल्या भीषण अपघातात एक महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. सरिता कापसे असे मृत महिलेचे नाव असून, ती तिच्या दुचाकीने घरी जात असताना हा अपघात घडला. दरम्यान, पोलिसांनी ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे.
ट्रकचा मागच्या चाकाखाली आल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सरिता कापसे आणि तिची मुलीच्या दुचाकीने सुयोग नगरकडून शताब्दी नगरकडे जात असताना ट्रक चालकाने दुचाकीला भरधाव वेगात ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ट्रकचा धक्का हा सरिता कापसे यांच्या गाडीला लागला. त्याचवेळी सरिता गाडीवरुन खाली पडल्या. त्याच क्षणी त्या ट्रकचा मागच्या चाकाखाली आल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. या अपघातात सरिता कापसे यांची मुलगी थोडक्यात बचावली आहे. अपघाताची माहिती समजताच अजनी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, पोलिसांनी ट्रक जप्त करून ट्रकला चालकाला अटक केली आहे.