नागपूर -नागपूर शहरातील सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शहीद आदिवासी गोवारी उड्डाणपुलावरून खाली पडल्याने दुचाकीवरील एका विवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवार (दि. 17 सप्टेंबर)रोजी अनिता दिलपे असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. भरधाव कारने दुचाकीला जोरदार दिल्याने झालेल्या अपघातामुळे महिलेचा पुलावरून पडल्याने मृत्यू झाला आहे. तर दुचाकीचालक पती गंभीर जखमी झाला आहे.
बोलेरो कारने मोटारसायकला दिलेल्या धडकेत नवविवाहीतेचा मृत्यू तर पती गंभीर जखमी - Bolero car collided with a motorcycle
शहरातील सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शहीद आदिवासी गोवारी उड्डाणपुलावरून खाली पडल्याने दुचाकीवरील एका विवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
![बोलेरो कारने मोटारसायकला दिलेल्या धडकेत नवविवाहीतेचा मृत्यू तर पती गंभीर जखमी बोलेरो कारने मोटारसायकला या पुलावर दढक दिली](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16401157-992-16401157-1663433865296.jpg)
उपचारासाठी रुग्णालयात - मयत अनिता ही तिच्या पती सोबत पुलावरून जात असताना मागून आलेल्या भरधाव बलेनो कारने त्यांचा दुचाकीला जोरदार धकड दिली, ज्यामुळे त्यांची गाडी ही पुलावरून खाली कोसळली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीचवर बसलेली अनिता थेट पुलावरून खाली फेकल्या गेली. ज्यामुळे अनिता यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर दुचाकीचालक अनिताचे पती पुलावरचं कोसळले. मात्र, ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आठवडाभरातील दुसरी घटना - पुलावरून पडल्याने मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना आहे. ९ सप्टेंबर रोजी रात्री सक्करदार पुलावर भरधाव कारने दुचाकीला धकड दिली होती,त्यामध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला होता.