नागपूर -शहरातील अंबाझरी पोलीस स्टेशन हद्दीत एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर काही नराधमांनी संगनमत करून सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. फेसबुकवर ओळख झालेल्या आरोपींनी सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार मुलीने दिली आहे. तक्रारीच्या अनुषंगाने अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे. या गुन्ह्यात एकूण किती आरोपी आहेत हे अद्याप निष्पन्न झाले नसून तपास प्राथमिक स्थरावर असल्याने सध्याच फारसी माहिती देता येणार नसल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ही घटना 2 फेब्रुवारीला घडली होती. आरोपींनी तिचे अपहरण केल्यानंतर तिला एका फ्लॅटमध्ये डांबून ठेवण्यात आले होते. त्याठिकाणी 5 ते 6 आरोपींनी मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची माहिती पीडितने आपल्या तक्रारीत दिली आहे. घटनेनंतर घाबरलेल्या मुलीने काल (गुरुवारी) रात्री नातेवाईकांच्या मदतीने अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.