नागपूर- विद्यार्थिनींना परीक्षेत पास करण्याचे आमिष दाखवून आणि विविध कारणांनी आर्थिक मदत देऊन त्यांच्याकडे शारीरिक सुखाची मागणी करणाऱ्या प्राध्यापकाविरुद्ध एका विद्यार्थिनीने पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
विद्यार्थिनींना आमिष देऊन शारिरीक सुखाची मागणी करणाऱ्या प्राध्यापकावर गुन्हा दाखल - Nagpur crime
पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंधू महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. विद्यार्थिनींच्या आर्थिक अडचणी हेरून हा प्राध्यापक त्या मुलींची मदत करायचा आणि त्याऐवजी त्यांच्याकडे शारीरिक सुखाची मागणी करायची, अशी ओळख प्राध्यापकाची आहे.
पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंधू महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. विद्यार्थिनींच्या आर्थिक अडचणी हेरून हा प्राध्यापक त्या मुलींची मदत करायचा आणि त्याऐवजी त्यांच्याकडे शारीरिक सुखाची मागणी करायची, अशी ओळख प्राध्यापकाची आहे. एवढचं नाही तर एखाद्या विद्यार्थिनीला एकट्यात गाठून तो मुलींच्या अंगाला नको त्या ठिकाणी स्पर्श करायचा अशी तक्रार पीडित मुलीने दिली आहे.
प्राध्यापकाचा छळ वाढल्याने विद्यार्थ्यांनी केली हिम्मत- या प्रकरणात तक्रार दाखल करणारी मुलगी ही सिंधू महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. या विद्यार्थिनीची ऍडमिशनसाठी प्राध्यापकाने मदत केली होती. त्यानंतर ते प्राध्यापक त्या मुलीच्या अंगाला वारंवार स्पर्श करून मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य करायचे. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांचे चाळे वाढले असल्याने अखेर पीडितेने पाचपावली पोलीस ठाण्यात जाऊन त्या प्राध्यापका विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.