नागपूर - नागपुरात सहा वर्षीय मुलीला भूत बाधा झाली, असे तांत्रिकाचे ऐकून स्वतःच्याच पोटच्या ( Girl died after beaten by father in Nagpur ) मुलीला वडिलांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेत मुलीचा मृत्यू झाला आहे. घटना नागपुरातील सुभाष नगर परिसरात घडली. या घटनेत राणा प्रताप नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आई वडील आणि मावशी अशा तिघांना ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा -Ganeshotsav 2022 : गणेश विसर्जनासाठी सर्व तलाव बंद; मंडळांना परवानगी घेतानाचं विसर्जनाची माहिती द्यावी लागणार
काही दिवसांपासून आजारी होती मुलगी - सहा वर्षीय मुलगी मागील काही दिवसांपासून आजारी राहत होती. तिचे हावभाव वेगळे असल्याने तिला भूतबाधा झाली, असा समज आई वडिलाचा झाला. यासाठी त्यांनी उपचार करण्यासाठी एका मांत्रिकाकडे नेले. त्याच्याच सांगणावरून सुभाष नगर परिसरात राहणारे मुलीचे वडील सिद्धार्थ चिमणे आणि रंजना चिमणे यांनी आपल्या लेकीला बेदम मारहाण केली. एका भोंदू बाबाच्या सल्ल्याने त्यांनी तिच्यावर वेगवेगळे उपचार सुरू केले. मात्र, त्याचा काहीच फायदा होत नव्हता.
मुलीला जबर मारहाण केली -शुक्रवार आणि शनिवार दरम्यानच्या रात्री चिमणे दाम्पत्य आणि त्यांच्या एका महिला (मावशी) नातेवाईकाने घरातच भूतबाधेतून मुक्त करण्याच्या नावाखाली मुलीला जबर मारहाण केली. तिला चटके सुद्धा देण्यात आले. एवढेच नाही तर चिमुकली जबर मारहाण सहन करू शकली नाही आणि निपचित पडली. घाबरलेल्या आई-वडिलांनी लगेच तिला जिएमसी रुग्णालयात नेले.मात्र, उपचारापूर्वीच मुलीचा मृत्यू झाला होता.
मृतदेह रुग्णालयाच्या आवारात ठेवून पळ काढला - आरोपी आई-वडील एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी आपण पकडले जाऊ या भीतीने मुलीचा मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या आवारात ठेवून तिथून पळ काढला. मात्र, रुग्णालयाच्या आवारात एका लहान मुलीचा मृतदेह बेवारस असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही माहिती सुभाष नगर परिसरातील असल्याने सतर्कतेने राणा प्रताप नगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक दीपक भीताडे यांनी आपले कर्मचारी पाठवत सूत्र हलवले. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करत हे मृतदेह या ठिकाणी कोणी आणून ठेवले याची माहिती मिळवली. मृतदेह कोणत्या गाडीतून त्या ठिकाणी आणण्यात आले हे सर्व तपासून आरोपींचा शोध लावला. याप्रकरणी आरोपी वडील सिद्धार्थ चिमणे, आई रंजना चिमणे आणि रंजनाची बहीण या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अटकेची करवाई सुरू आहे.
हेही वाचा -Faculty Unemployment : डॉक्टरेट प्राध्यापकांवर हॉटेलमध्ये काम करण्याची वेळ; नेट सेट धारकांचा प्रश्न गंभीर