नागपुर -भंडारा जिल्ह्यात एका ३५ वर्षीय महिलेवर (A 35 year-old woman ) तीन नराधमांनी बलात्कार ( rape ) करून तिला रस्त्याच्या कडेला फेकून दिले होते. तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. तसेच तिचा जबाब नोंदवण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली. पुढील उपचारासाठी महिलेला नागपूरला पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ ( BJP leader Chitra Wagh ) यांनी रुग्णालयात जाऊन पीडितेची भेट घेतली आहे. चित्रा वाघ म्हणाल्या की पशूनांही लाजवेल अले कृत्य नराधमानी केले आहे. मदतीच्या नावावर आरोपींनी बलात्कार केला ही सर्वात वाईट घटना असल्याच्या त्या म्हणाल्या.
रस्त्यावर फेकून पळ -प्राप्त माहितीनुसार मदतीच्या बहाण्याने 35 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे तीन नराधमांकडून महिलेवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) करण्यात आला. यावेळी तिला दोन वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार करण्यात आला. आणि नंतर तिला रस्त्यावर फेकून पळ काढला. या महिलेवर सध्या उपचार सुरु आहेत. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. आहे तर एक आरोपी सध्या फरार आहे.