महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागपूर जिल्ह्यात 59% मतदान; निवडणूक आयोगाचा प्राथमिक अंदाज

नागपूर जिल्ह्यातील ४ हजार ४१२ मतदान केंद्रावर सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५४.७८ टक्के मतदान झाले. एकूण 12 विधानसभा मतदारसंघात 55.72 टक्के मतदान होण्याचा अंदाज आहे.

नागपूर जिलह्यात 59% मतदान

By

Published : Oct 21, 2019, 11:27 PM IST

नागपूर - विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात शांततेत मतदान पार पडले. 4 हजार 412 मतदान केंद्रांवर सायंकाळी 5 वाजेपर्यंत 54.78 टक्के मतदान झाले असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत सरासरी 58 ते 59 टक्के मतदानाचा अंदाज आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे मतदान संपल्यानंतर प्राप्त होणाऱ्या एकूण मतदानाच्या आकडेवाडीनुसार मतदानाची टक्केवारी रात्री उशिरापर्यंत प्राप्त होईल.

नागपूर जिलह्यात 59% मतदान

विधानसभा मतदारसंघनिहाय सायंकाळी उशिरापर्यंत प्राप्त झालेल्या मतदानाच्या एकूण अंदाजानुसार टक्केवारी

काटोल 64.55
सावनेर 66.25
हिंगणा 57.15
उमरेड 68.03
नागपूर दक्षिण-पश्चिम 49.51
नागपूर दक्षिण 48.94
नागपूर पूर्व 53.18
नागपूर मध्य 50.13
नागपूर पश्चिम 48.45
नागपूर उत्तर 50.71
कामठी 57.20
रामटेक 62.69

एकूण 12 विधानसभा मतदारसंघात 55.72 टक्के मतदानाचा अंदाज आहे. अंतिम टक्केवारीत वाढ होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details