नागपूर -नागपुरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांवर आळा घालायचा असेल आणि गुन्हेगारांचे कंबरडे मोडायचे असेल तर पोलीस यंत्रणा सक्षम करणे महत्त्वाचे आहे. पोलिसांची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने नागपूर पोलिसांच्या ताफ्यात 14 चारचाकी आणि 72 दुचाकी वाहने सहभागी झाले आहेत. जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत ही वाहने खरेदी करण्यात आली आहेत. नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते या वाहनांना हिरवी झेंडी दाखवून कर्तव्यावर रवाना करण्यात आले आहे. यावेळी नागपूर शहाराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्यासह सर्व पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त आणि पोलीस निरीक्षक उपस्थित होते.
राज्याच्या उपराजधानीचा मान असलेल्या नागपूर शहराला क्राईम कॅपिटल, असेही म्हंटले जाते. नागपूरमध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांची वाढती संख्या नेहमीच चिंतेचा विषय राहिलेला आहे. तब्बल सात वर्षे राज्याचे गृहमंत्रीपद नागपूरकडे असतानाही गुन्ह्यांची संख्या कमी झाली नाही किंवा गुन्हेगारांवर वचक बसवता आले नाही. मात्र, आता गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी नागपूर पोलिसांचे हात मजबूत करणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांना वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
गस्तीवर दिला जाणार सर्वाधिक भर