नागपूर - जिल्ह्यात कोरोनाच्या मृत्यूसंख्येने पुन्हा सत्तरीची संख्या ओलांडली आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना 6 हजार 196 नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीची परिस्थिती नियंत्रणा बाहेर जाताना दिसून येत आहे. प्रशासनाकडून जम्बो कोविड हॉस्पिटलसाठी जागेची चाचपणी सुरू आहे. हे प्रशासनाला उशिरा सुचलेले शहाणपण सत्यात उतरवण्यासाठी लवकर पाऊले उचलण्याची गरज आहे.
हेही वाचा-कोरोनामुळे 'सीआयएससीई'च्या इयत्ता 10 आणि 12 च्या परीक्षा पुढे ढकलल्या
जिल्ह्यात शुक्रवारी 25 हजारांपेक्षा जास्त कोरोना संशयितांची चाचणी करण्यात आली आहे. शहरात 3 हजार 458 तर ग्रामीण भागात 2 हजार 350 बाधितांची भर पडली आहे. नागपूर शहरात 37 जणांचा मृत्यू, ग्रामीण भागात 31 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातही 7 जण दगावले आहेत. यात आजतागायत 6 हजार 109 जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे. कोरोनाबाधितांची संख्या 64 हजार 335 झाली आहे. तेच आज 5 हजार 894 कोरोनातून मुक्त झाले आहेत. तेच नागपूर जिल्ह्यात 16 दिवसात 1हजार 11 जण कोरोनाने दगावले आहेत. यामुळे आरोग्य व्यवस्था कशी तोकडी पडून राहिली हे दिसून येत आहे.
हेही वाचा-खळबळजनक! कोरोना संशयित रुग्ण आणि इतर रुग्णांवर एकाच ठिकाणी उपचार
पूर्व विदर्भातसुद्धा वाढला कोरोनाचा संसर्ग -
पूर्व विदर्भात सुद्धा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. 10 हजार 503 कोरोनाबधितांची भर पडली आहे. यामुळे तेच भंडारा जिल्ह्यात 1 हजार 393 कोरोनाबाधित आढळले आहेत. चंद्रपूर 1 हजार 135 जण, गोंदिया मध्ये 571, वर्ध्यात 745 तर गडचिरोलीमध्ये 465 बाधितांची भर पडली आहे. तर 109 जण कोरोनाने दगावले आहेत. यासोबतच सात हजार 732 कोरोनातून मुक्त झाले आहेत. पूर्व विदर्भात दररोज आढळणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची टक्केवारी 22.87 टक्के इतकी झाली आहे.