महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागपुरात कोरोनाचा उद्रेक, रविवारी 7201 नव्या रुग्णांची नोंद

रविवारी नागपुरात 7201 नवे कोरोना रुग्ण आढळून आले, तर 63 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील जिल्ह्यांतही अशीच परिस्थिती असून 105 जणांच्या मृत्यूची नोंद पूर्व विदर्भात झाल्याने चिंता वाढली आहे.

नागपुरात कोरोनाचा उद्रेक, रविवारी 7201 नव्या रुग्णांची नोंद
नागपुरात कोरोनाचा उद्रेक, रविवारी 7201 नव्या रुग्णांची नोंद

By

Published : Apr 12, 2021, 6:24 AM IST

नागपूर- नागपूर जिल्ह्यात कोरोनाचे थैमान दिवसागणिक वाढत आहे. यात दैनिक रुग्णसंख्या आता 7 हजारांपुढे जाऊन पोहचली आहे. रविवारी सायंकाळच्या आकडेवारीनुसार 24 तासांत आतापर्यंतचे सर्वाधिक बाधित नवे रुग्ण आढळून आले आहेत. रविवारी नागपुरात 7201 नवे कोरोना रुग्ण आढळून आले, तर 63 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील जिल्ह्यांतही अशीच परिस्थिती असून 105 जणांच्या मृत्यूची नोंद पूर्व विदर्भात झाल्याने चिंता वाढली आहे.

पूर्व विदर्भात 10 हजार नवे रुग्ण
राज्याचे उपराजधानीचे शहर असलेले नागपूर कोरोनाचा हॉटस्पॉट झाले आहे. दररोज रुग्ण संख्या वाढत चालली आहे. आठवडाभराच्या लॉकडाऊननंतरही परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचेच दिसत आहे. नागपूर जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे 7 हजार 201 नवे रुग्ण आढळले. तर 63 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. याशिवाय पूर्व विदर्भातील भंडारामध्ये 1446, चंद्रपुरात 937, गोंदियात 735, वर्ध्यात 386, गडचिरोलीत 165 बाधितांची भर पडली आहे. या सहा जिल्ह्यांत एकूण 10 हजार 862 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर रविवारी 4 हजार 679 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत नागपूर जिल्ह्यात 5 हजार 769 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

जम्बो रुग्णालयाची गरज
वाढती रुग्णसंख्या पाहता 3 हजार बेड हे अपुरे पडत आहे. नागपूर शहरात 36 हजार 485 तर ग्रामीण मध्ये 18 हजार 989 सक्रीय रुग्ण असतांना त्यांना उपलब्ध बेड अपुरे पडत आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता जम्बो रुग्णालयाची गरज व्यक्त केली जात आहे. नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी आपत्कालीन 500 बेडचे रुग्णलाय नागपूरच्या स्टेडियमवर उभे करावे या संदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्याशी चर्चा करून निर्देश दिले आहे. यात 10 कोटी स्थायी समितीच्या प्रस्तावित बजेटमधून नियोजन करून 7 दिवसांत हे रुग्णलाय उभारावे असे निर्देश दिले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details