महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Clove Stuck in Woman Lungs : सात वर्षापूर्वी फुफ्फुसात अडकली लवंग; परिणाम चार वर्षानंतर, डॉक्टरांनी दिले जिवदान - Clove stuck in a womans lungs

सात वर्षांपूर्वी कधीतरी लवंग खालली आणि ती फुफ्फुसात जाऊन अडकली. याचे परिणाम मात्र तीन चार वर्षानी खोकल्याच्या स्वरूपात सुरू झाले. वजन घटले, प्रचंड खोकला, थुंकीतून रक्तस्त्राव असे लक्षणे असल्याने सुरवातीला कॅन्सरचीही शक्यता इंदोरच्या फॅमिली डॉक्टरने व्यक्त केली. नागपूरत उपचार सुरू झाले. सूक्ष्म परिक्षणानंतर कॅन्सर नसून फुफ्फुसात लवंग ( Clove Stuck in Woman Lungs ) अडकल्याचे समोर आले.

Clove Stuck in Woman Lungs
महिलेच्या फुफ्फुसात अडकली लवंग

By

Published : Feb 4, 2022, 1:18 PM IST

नागपूर - सात वर्षांपूर्वी कधीतरी लवंग खालली आणि ती फुफ्फुसात जाऊन अडकली. याचे परिणाम मात्र तीन चार वर्षानी खोकल्याच्या स्वरूपात सुरू झाले. वजन घटले, प्रचंड खोकला, थुंकीतून रक्तस्त्राव असे लक्षणे असल्याने सुरवातीला कॅन्सरचीही शक्यता इंदोरच्या फॅमिली डॉक्टरने व्यक्त केली. नागपूरत उपचार सुरू झाले. सूक्ष्म परिक्षणानंतर कॅन्सर नसून फुफ्फुसात लवंग अडकल्याचे समोर आले.

फुफ्फुसाच्या खालील भागात गाठ आढळली -

मूळच्या इंदोरच्या असलेल्या ३६ वर्षीय अनुषा यांना गेल्या मागील दोन वर्षांपासून खोकल्याचा प्रचंड त्रास लागला. औषध उपचार करूनही त्रास कमी न होता वाढतच गेला. उलट मागील तीन महिन्यात खोकला आणि थुंकीतून रक्त येत असल्याने भिती वाढली. इंदोरच्या फॅमिली डॉक्टरने कॅन्सरची शंका व्यक्त केली. मागील दोन महिन्यात हा त्रास फार वाढला. इंदोर येथील डॉक्टरांनी छातीचा सिटीस्कॅन करून कर्करोगाची शक्यता व्यक्त केली होती. सिटीस्कॅनमध्ये डाव्या फुफ्फुसाच्या खालील भागात गाठ आणि न्युमोनियाचे निदान झाले. ही गाठ कर्करोगाची वाटत असल्याने ब्रॉन्कोस्कोपी करून बायस्पी करण्यात आली. पण रिपोर्टमध्ये कॅनसरचे विषाणू शरीरात न मिळाल्याने त्रासाचे निदान होऊ शकले नाही.

तोंडाद्वारे फुफ्फुसांमध्ये दुर्बिन घालून पूर्ण प्रक्रिया -

अखेर 36 वर्षीय अनुषा नागपूरचे श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांच्याकडे पोहचल्यात सुरुवतीच्या तपासण्यात काहीच लक्षात आले नाही. पण सूक्ष्म परीक्षण केल्यावर कर्करोग नाही फूफुसात काहीतरी अडकले असल्याचे निदान झाले कुठलीही चिरफाड न करता तोंडाद्वारे फुफ्फुसांमध्ये दुर्बिन (ब्रॉन्कोस्कोप) घालून पूर्ण प्रक्रिया करण्यात आली. एकूणच यामुळे कर्करोगाची लक्षणे दिसत असले तरी लवंग निघाली आणि चार वर्षांनी खोकल्याचा त्रासापासून सुटका मिळाली.

हेही वाचा -The Student Bus Overturned : नाशिकमध्ये कॉलेजचे विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात, सुमारे 17 विद्यार्थी जखमी

ABOUT THE AUTHOR

...view details