नागपूर-राज्याच्या उपराजधानीत कोरोनाचा कहर सुरुच आहे. नागपूरात ५७ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात नागपूर शहरात आणि जिल्ह्यात तब्बल ५, ९९३ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित असलेल्या रुग्णांची संख्या ४०, ८०७ इतकी झाली आहे.
संपूर्ण नागपूर शहरात आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत आहे. एकीकडे कोरोनाबधितांचा आकडे सुसाट वेगाने वाढत असल्याने सरकारी आणि खासगी रुग्णालयात एकही बेड उपलब्ध नसल्याची भीषण परिस्थिती आहे. बुधवारी नागपूर शहरात आणि जिल्ह्यात ५,९९३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या ६३, ००५ इतकी झाली आहे. आज बाधित झालेल्या नागरिकांमध्ये २, ३७५ रुग्ण ग्रामीण नागपूरचे तर ३६१३ रुग्ण हे नागपूर महानगरपालिका हद्दीतील आहेत. आज ५७ कोरोनाबधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूची संख्या ही ५, ९६० इतकी झाली आहे. मृतांमध्ये १७ रुग्ण हे नागपूरच्या ग्रामीण भागातील आहेत. तर ३५ रुग्ण हे शहरातील आहेत. याशिवाय मृतामध्ये जिल्ह्याबाहेरील ५ रुग्णांचा समावेश आहे.