नागपूर - शिवसेनेचे निष्ठावंत असलेले माजी महापौर शेखर सावरबांधे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांच्यासह शिवसेनेच्या अनेका कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे नेते माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत शनिवारी रात्री शिवबंधन तोडत हातात घड्याळ बांधले. सेना आणि युवा सेनेच्या सुमारे 50 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
नागपुरात माजी महापौरांसह 50 शिवसैनिकांनी शिवबंधन सोडून हाती बांधले घड्याळ.. - शिवसैनिकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
शिवसेनेचे निष्ठावंत असलेले माजी महापौर शेखर सावरबांधे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांच्यासह शिवसेनेच्या अनेका कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे नेते माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत शनिवारी रात्री शिवबंधन तोडत हातात घड्याळ बांधले.

Shiv Sena worker entry in ncp
माजी महापौरांसह ५० शिवसेना कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या महाविकास आघाडी पक्षाचे सरकार असले तरी अंतर्गत कलहामुळे आणि हेव्यादाव्यांमुळे तिन्ही पक्षातील कार्यकर्ते इकडून तिकडे प्रवेश करताना दिसून येत आहेत. यात पक्षात मानसन्मान मिळत नसल्याने निष्ठावंत अशी ओळख असलेले शेखर सावरबांधे यांनी सेनेला निरोप देत राष्ट्रवादीशी जुळवून घेतले आहे. शिवसेनेतील त्यांच्या गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते लवकरच शिवसेना सोडतील अशी शक्यता व्यक्त होत होती. या सोहळ्यात सुमारे 50 कार्यकर्त्यांनी शेखर सावरबांधे यांच्या पावलावर पाऊल टाकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. येत्या काळात नागपुरात शिवसेनेला आणखी गळती लागण्याची शंका व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रवादीच्या पक्षनेतृत्वार विश्वास पक्षप्रवेश -
माजी माहापौर शेखर सावरबांधे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने नक्कीच फायदा होणार आहे. यासोबत अनेक लोकांचा त्याच्यावर विश्वास आहे ते लोक त्याच्यासोबत आले आहेत. यासोबत हा एक प्रकारे चांगले संकेत आहेत. ज्यात अनेक जण राष्ट्रवादीच्या विचारांशी जुळवून घेत पक्षात येत आहेत. यात पक्षाचे ध्येय धोरण आणि नेतृत्वामुळे लोक पक्षावर विश्वास ठेवत असल्याचेही राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यावेळी म्हणाले.
Last Updated : Oct 10, 2021, 7:16 PM IST