महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nagpur murder cases 2021 क्राईम सिटी नागपुरात आठ महिन्यात ४५ हत्येच्या घटनांची नोंद - नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो अहवाल नागपूर

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार National Crime Records Bureau हत्येच्या घटनांमध्ये उपराजधानी नागपूर शहर अव्वल स्थानावर Nagpur city tops in murder cases असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात ही बाब नागपूर शहर पोलिसांसाठी भूषणावह नाही Nagpur City Police. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी हत्येच्या घटनांची संख्या घटली आहे, हे देखील महत्त्वाचे आहे. १ जानेवारी ते ३० ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत नागपूर शहरात एकूण ४५ हत्येच्या घटना 45 murder in 8 months in Nagpur घडल्या आहेत. दर महिन्यात सरासरी पाच ते सहा हत्येच्या घटना घडल्या आहेत.

Number of Murder Nagpur
नागपुरात आठ महिन्यात ४५ हत्येच्या घटनांची नोंद

By

Published : Aug 30, 2022, 7:48 PM IST

Updated : Aug 30, 2022, 10:31 PM IST

नागपूर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार National Crime Records Bureau हत्येच्या घटनांमध्ये उपराजधानी नागपूर शहर अव्वल स्थानावर Nagpur city tops in murder cases असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात ही बाब नागपूर शहर पोलिसांसाठी भूषणावह नाही Nagpur City Police. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी हत्येच्या घटनांची संख्या घटली आहे, हे देखील महत्त्वाचे आहे. १ जानेवारी ते ३० ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत नागपूर शहरात एकूण ४५ हत्येच्या घटना 45 murder in 8 months in Nagpur घडल्या आहेत. दर महिन्यात सरासरी पाच ते सहा हत्येच्या घटना घडल्या आहेत. त्यातही नागपूरच्या इतिहासात पहिल्यांदाच फेब्रुवारी महिन्यात एकही हत्येची घटना घडली नाही. मात्र, त्यानंतर सातत्याने हत्येच्या घटना घडत आहेत. NCRB Murder report on Nagpur

पोलीस आयुक्त कार्यालय, नागपूर

नागपूर गुन्हेगारी विश्वाची राजधानी गेल्या वर्षीच्या तुलनेत हत्येच्या घटनांचा आकडा काहीसा कमी झाला असला तरी आठ महिन्यात ४५ हत्या झाल्याने Nagpur murder cases 2021 पोलिसांच्या कार्य प्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राज्याची उपराजधानी नागपूर शहर गुन्हेगारी विश्वाची राजधानी म्हणून गेल्या काही वर्षात कुप्रसिद्ध झाले आहे. दर महिन्याला ८ ते १० हत्येच्या घटना नागपुरात घडत असतात,त्या हिशोबाने वर्षाला सरासरी शंभर हत्या होतात. मात्र,यावर्षी या आकड्यात घट होण्याची शक्यता असली तरी आठ महिन्यात ४५ हत्या झल्यामुळे यावर्षी देखील हत्येच्या घटनांचे शतक होईल तर नाही अशी भीती व्यक्त केली जाते आहे.


मार्च महिन्यात सर्वाधिक ११ हत्यानागपूर शहरात दरमहिन्यात सरासरी हत्येच्या ५ घटनांची नोंद आहे. त्यातही फेब्रुवारी मध्ये एकही हत्या झाली नाही. मात्र,मार्च महिन्यात सर्व कसर भरून निघाली होती. एकट्या मार्च महिन्यात सर्वाधिक ११ हत्येच्या घटना घडल्या आहेत. जानेवारी महिन्यात ५,फेब्रुवारीमध्ये ०, मार्च महिन्यात ११, एप्रिल महिन्यात ४, मे मध्ये ६, जून महिन्यात ४ तर जुलै महिन्यात ८ आणि सुरू असलेल्या ऑगस्ट महिन्यात ७ हत्येच्या घटनांची नोंद झाली आहे.


गुन्हेगारी मोडीत काढा- पोलीस आयुक्तनागपूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेऊन शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गेल्या महिन्यात तीन पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केलेल्या होत्या. शहरातील गुन्हेगारांचा बंदोबस्त करा अन्यथा खुर्ची रिकामी करा असा संदेश पोलीस आयुक्तांनी दिलेला आहे.

हेही वाचाMaharashtra leads states in IPC crimes: आयपीसी गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र देशात आघाडीवर, गुन्ह्यात उत्तर प्रदेशचा दुसरा नंबर

Last Updated : Aug 30, 2022, 10:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details