महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nagpur Crime Record : नागपुरात हत्येच्या सरासरी घटनांमध्ये घट; सात महिन्यात 37 हत्या

नागपूर शहरात सात महिन्यात एकूण ३७ हत्येच्या घटना घडल्या आहेत. दर महिन्यात सरासरी 5 ते 6 हत्येच्या घटना घडल्या आहेत. त्यातही नागपूरच्या इतिहासात पहिल्यांदाच ( Nagpur murder incident recorded ) फेब्रुवारी महिन्यात एकही हत्येची घटना घडली नाही. मात्र, त्यानंतर सातत्याने हत्येच्या घटना घडत आहेत.

Nagpur police
Nagpur police

By

Published : Jul 27, 2022, 4:02 PM IST

नागपूर -1 जानेवारी ते २७ जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत नागपूर शहरात एकूण ३७ हत्येच्या घटना घडल्या आहेत. दर महिन्यात सरासरी 5 ते 6 हत्येच्या घटना घडल्या आहेत. त्यातही नागपूरच्या इतिहासात पहिल्यांदाच ( Nagpur murder incident recorded ) फेब्रुवारी महिन्यात एकही हत्येची घटना घडली नाही. मात्र, त्यानंतर सातत्याने हत्येच्या घटना घडत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हत्येच्या घटनांचा आकडा दहाने कमी झाला असला तरी सात महिन्यात ३७ हत्या झाल्याने पोलिसांच्या कार्य प्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

राज्याची उपराजधानी नागपूर शहर गुन्हेगारी विश्वाची राजधानी म्हणून गेल्या काही वर्षात कुप्रसिद्ध झाले आहे. दर महिन्याला 8 ते 10 हत्येच्या घटना नागपुरात घडत असतात. त्या हिशोबाने वर्षाला सरासरी शंभर हत्या होतात. मात्र, यावर्षी या आकड्यात घट होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी एक जानेवारी ते २७ जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत नागपूर शहरात एकूण ४६ हत्येच्या घटना घडल्या होत्या.



मार्च महिन्यात सर्वाधिक ११ हत्या :नागपूर शहरात दरमहिन्यात सरासरी हत्येच्या 5 घटनांची नोंद आहे. त्यातही फेब्रुवारीमध्ये एकही हत्या झाली नाही. मात्र, मार्च महिन्यात सर्व कसर भरून निघाली होती. एकट्या मार्च महिन्यात सर्वाधिक 11 हत्येच्या घटना घडल्या आहेत. जानेवारी महिन्यात 5,फेब्रुवारीमध्ये 0, मार्च महिन्यात 11, एप्रिल महिन्यात 4, मे मध्ये 6, जून महिन्यात 4 तर सुरू असलेल्या जुलै महिन्यात आतापर्यंत 7 हत्येच्या घटनांची नोंद झाली आहे.



'गुन्हेगारांना वठणीवर आणा' :नागपूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठातल्याचा ठपका ठेऊन शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी तीन पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केलेल्या आहेत. शहरातील गुन्हेगारांचा बंदोबस्त करा अन्यथा खुर्ची रिकामी करा, असा संदेश पोलीस आयुक्तांनी दिल्याने अधिकाऱ्यांचे धाबे आधीच दणाणले आहेत. त्यातच आता सात महिन्यात ३७ हत्या झाल्याचा आकडा पुढे गुन्हेगारांकडे विशेष लक्ष दिले जात आहे.

हेही वाचा -Beed Crime : धक्कादायक! दुसरी मुलगी नको म्हणून परळीत अक्षरशः कापून काढला गर्भ

ABOUT THE AUTHOR

...view details