महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nagpur Jail : कोरोना काळातील पेरोलवर सुटलेले कैदी परतलेच नाहीत, बुधवारापासून होणार कारवाई - नागपूर लेटेस्ट न्यूज

अनेक बंदिवानांचा मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकारने सर्वच कारागृहातून हजारो कैद्यांना आकस्मिक अभिवचन रजा म्हणजेच पेरोलवर सोडण्यात आले होते. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातुन सुध्दा 496 कैद्यांना आकस्मिक अभिवचन रजेवर सोडण्यात आले होते. मात्र यातील 130च कैदी परत आले आहेत.

Nagpur Jail
कोरोना काळातील पेरोलवर सुटलेले कैदी परतचं नाहीत

By

Published : May 31, 2022, 3:33 PM IST

नागपूर -गेल्यावर्षी ज्यावेळी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यावेळी राज्यातील कारागृहांमध्ये सुद्धा कोरोनाने धुमाकूळ घातला होता. अनेक बंदिवानांचा मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकारने सर्वच कारागृहातून हजारो कैद्यांना आकस्मिक अभिवचन रजा म्हणजेच पेरोलवर सोडण्यात आले ( Prisoners Released On Parole in Corona Period) होते. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातुन सुध्दा 496 कैद्यांना आकस्मिक अभिवचन रजेवर सोडण्यात आले होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे संपला असताना कारागृह प्रशासनाने कोरोना काळात पॅरोलवर बाहेर आलेल्या सर्व कैद्यांना परत कारागृहात हजर होण्याचे आदेश दिले होते. मात्र 496 पैकी केवळ 130 कैदीचं आतापर्यंत तुरुंगात परतले आहेत. उर्वरित 360 कैदी अजूनही मोकाट फिरत असल्याने नागपुरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ ( Prisoners Released On Parole Not Returned To Nagpur Jail ) शकतो. त्यामुळे आता पॅरोलवर मोकाट झालेल्या कैद्यांची पुन्हा कारागृहात रवानगी करण्यासाठी नागपूर पोलिसांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

गृह विभागाच्या आदेशाकडे कैद्यांचे दुर्लक्ष -कोरोना प्रादुर्भावाच्या काळात राज्यातील सर्वच कारागृहातील गर्दी कमी करण्यासाठी राज्याच्या गृह विभागाने सात वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेल्या प्रकरणातील हजारो कैद्यांना आकस्मिक अभिवचन रजेवर तुरुंगाबाहेर पाठवले होते. कोरोना संकट टळल्यानंतर नुकतेच या सर्व कैद्यांनी परत तुरुंगात परतावे, असे आदेश काढण्यात आले. नागपूर विभागात त्या आदेशाची मर्यादा 27 मे रोजी संपल्यानंतरही नागपूरच्या तुरुंगातून आकस्मिक अभिवचन रजा मिळालेल्या 496 कैद्यांना पैकी फक्त 130 कैदीच तुरुंगात परतले आहे. त्यामुळे बहुतांशी कैद्यांनी गृह विभागाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.

अमितेशकुमार यांची प्रतिक्रिया

नागपूर पोलिसांचे वाढले टेन्शन -नागपूरच्या तुरुंगातून अभिवचन रजेवर सुटलेले अनेक कैदी कुख्यात गुन्हेगार होते. ते तुरुंगात परत न आल्यामुळे पोलिसांचे टेंशन वाढले आहे. 360 कैद्यांमुळे आधीच क्राईम कॅपिटल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरात कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ नये अशी चिंता नागपूर पोलिसांना आहे.

48 तासात कैद्यांना शोधा -नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी नागपूरच्या सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांना पेरोलवर सुटून ही तुरुंगात न परतलेल्या कैद्यांना शोधण्याचे आदेश दिले आहे. 48 तासात हे बेपत्ता झालेले कैदी सापडले नाही, तर या कैद्यांच्या अभिवचन रजेसाठी गॅरंटी (हमी) घेणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहे.

हेही वाचा -बहुजनांचे लचके तोडायचा डाव, राष्ट्रवादीच्या कार्यक्रमावर पडळकर कडाडले

हेही वाचा -Sanjay Raut on supriya sule : सर्व नेते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर खूश, तेच पुढची पंचवीस वर्षे मुख्यमंत्री - संजय राऊत

हेही वाचा -Hanuman Birth Place Controversy : हनुमान जन्मस्थळ वादावरून नाशिकमध्ये शास्त्रार्थ सभा, गोविंदानंद महाराज खुर्चीवर बसल्याने वाद

ABOUT THE AUTHOR

...view details