नागपूर - नागपूर पोलीस दलातील 350 अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याची माहिती ( Corona infection to Nagpur Police ) नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार ( Nagpur Police commissioner Amiteshkumar ) यांनी दिली आहे. दर दिवशी 30 ते 35 कर्मचारी कोरोनाबाधित होत असल्याचेदेखील त्यांनी सांगितले आहे. सुदैवाने यापैकी केवळ एकाच कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. इतर सर्व कर्मचारी गृह विलगीकरणात असल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले आहे.
संपूर्ण राज्यात कोरोना आणि ओमयक्रॉन बाधित रुग्णांची संख्या धोकादायकरित्या वाढत आहे. कोरोना बाधितांमध्ये फ्रंटलाईन वर्कर्सची संख्या फार मोठी आहे. नागपूर पोलीस दलातील 350 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची आहे. सर्व कोरोना बाधित पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची तब्येत ठणठणीत आहे. गेल्यावर्षी लसीकरणाची मोहीम सुरू झाली होती. त्यावेळी फ्रंट लाईन वर्कर म्हणून नागपूर पोलीस दलातील तब्बल ९७ टक्के अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतलेला ( corona vaccination in Nagpur Police ) आहे.
हेही वाचा-Police Employees Corona Positive : पुणे शहरात पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
सर्व अधिकारी आणि कर्मचारी ठणठणीत
दररोज नागपूर पोलीस दलात काम करणाऱ्या 30 ते 35 जणांना कोरोनाची ( daily corona cases in Nagpur Police ) लागण होत आहे. गेल्या आठवड्यात हा आकडा केवळ 26 इतका होता. मात्र, सात दिवसात कोरोनाबाधित पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा आकडा 350 च्या पुढे गेला आहे. सुदैवाने एक कर्मचारी वगळता इतर सर्व कर्मचारी ठणठणीत आहेत. सर्व गृह विलगीकरणात असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार ( Nagpur Police commissioner on corona cases in Police ) यांनी दिली आहे.