नागपूर- औरंगाबाद एक्सप्रेस हायवेवर तांदळाचा ट्रक व डांबराचा टँकर यांच्यात बुधवारी दुपारी समोरासमोर धडक झाली. या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेडजवळ समोरासमोर झालेल्या या भीषण अपघातात दोन्ही वाहनांची कॅबीन चकनाचूर झाली.
नागपूर - औरंगाबाद महामार्गावर ट्रक-टँकरची समोरासमोर धडक; तीन गंभीर - ट्रक
चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेडजवळ ट्रक आणि टँकरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.
भंडाऱ्यावरून मुंबईकडे तांदूळ घेऊन जाणारा ट्रक ( एमएच-16, सीसी-7571 ) आणि नागपूरकडे जाणाऱ्या टँकरची ( एमएच-46, बीबी-6937 ) घुईखेड ते चंद्रभागा नदीजवळ जोरदार धडक झाली. यामध्ये तांदळाच्या ट्रकचा चालक संजय भिमराव सिरसाठ ( रा. टेंभुर्णी ता. शिरूर जि. बीड ), क्लिनर दीपक खेडकर ( रा. आगासखेड ता. पाथर्डी जि. अहमदनगर ) व डांबराच्या टँकरचा चालक, असे तिघे गंभीर जखमी झाले. तिघांनाही 108 क्रमांकाच्या रूग्णवाहिकेने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघात एवढा भीषण होता, की दोन्ही ट्रकच्या कॅबीनचा अक्षरश: चुराडा झाला. या अपघातानंतर बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. यानंतर देवगाव महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. सदर घटनेचा पुढील तपास तळेगाव दशासर पोलीस ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक वसंत राठोड, सुरेंद्र कोहरे करीत आहेत.