महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूक : विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण न केल्याने दुसऱ्या क्रमांकाच्या मतमोजणीला प्रारंभ - संदीप जोशी

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीला गुरुवारी सुरुवात झाली. या मतमोजणीत विजयी होण्यासाठी आवश्यक असणारा मतांचा कोटा कोणताही उमेदवार पूर्ण करू शकला नाही. त्यामुळे मतदान प्रक्रियेतील भाग क्रमांक दोनला सुरुवात झाली आहे.

COUNTING
निकाल

By

Published : Dec 4, 2020, 7:35 AM IST

नागपूर- पदवीधर निवडणुकीमध्ये पाचव्या फेरीअखेर विजयी होण्यासाठी आवश्यक असणारा मतांचा कोटा कोणताही उमेदवार पूर्ण करू शकला नाही. त्यामुळे मतदान प्रक्रियेतील भाग क्रमांक दोनला सुरुवात झाली. दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतमोजणीला पहाटे सुरुवात करण्यात आली आहे. पाचव्या फेरीअखेर एकूण १ लाख ३३ हजार ५३ मतांपैकी ११ हजार ५६० अवैध व १ लाख २१ हजार ४९३ मते वैध ठरलीत.

नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी..

आतापर्यंत मिळालेली मतं -

विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी जाहीर केलेली पहिल्या पसंतीची उमेदवार निहायमते पुढील प्रमाणे आहेत. अभिजीत वंजारी ५५ हजार ९४७, संदीप जोशी ४१ हजार ५४०, राजेंद्रकुमार चौधरी २३३, इंजीनियर राहुल वानखेडे ३ हजार ७५२, ॲड. सुनिता पाटील २०७, अतुलकुमार खोब्रागडे ८ हजार ४९९, अमित मेश्राम ५८, प्रशांत डेकाटे १ हजार ५१८, नितीन रोंघे ५२२, नितेश कराळे ६ हजार ८८९, डॉ. प्रकाश रामटेके १८९, बबन तायवाडे ८८, ॲड. मोहम्मद शाकीर अ. गफ्फार ६१, सी .ए. राजेंद्र भुतडा १ हजार ५३७, प्रा. डॉ. विनोद राऊत १७४, ॲड. विरेंद्र कुमार जायस्वाल ६६, शरद जीवतोडे ३७, प्रा. संगीता बढे १२० आणि इंजीनियर संजय नासरे ५६ मते पडली आहेत. प्रत्येक फेरीत २८ हजार मतांची मोजणी होत होती. तथापि, पाचव्या फेरीमध्ये उर्वरित २१ हजार ५३ मतांची मोजणी करण्यात आली. या निवडणुकीत एकूण वैध मते १ लक्ष २१ हजार ४९३ ठरली. ११ हजार ५६० मते अवैध ठरली.

पाचव्या फेरीनंतर एकाही उमेदवाराने मतदानाचा कोटा पूर्ण केला नाही. त्यामुळे दुस-या पसंती क्रमांकाच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

हेही वाचा -मराठवाडा पदवीधर निवडणूक; महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांची हॅट्रिक

ABOUT THE AUTHOR

...view details