नागपूर -शहरातील कपील नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाची दोन आरोपींनी मिळून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. कमलेश बंडू सहारे (२७) असे मृतक तरुणाचे नाव असून तो गड्डीगोदाम परिसरातील रहिवासी आहे. एकतर्फी प्रेम प्रकरणातून कमलेशची हत्या तरुणीच्या दोन भावांनी एका मित्राच्या मदतीने केल्याची माहिती पुढे आली आहे.
या प्रकरणातील मृतक कमलेश सहारे याची मोठी बहीण म्हाडा कॉलनीत राहते. कमलेशने काही महिन्यांपूर्वी बहिणीच्या घरासमोर राहणाऱ्या अल्पवयीन तरुणीची छेड काढली होती, असा त्याच्यावर आरोप होता. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून त्याला पोलिसांनी अटक देखील केली होती. कारागृहातून बाहेर आल्यानंतर तो काल (बुधवारी) रात्री बहिणीला भेटण्यासाठी तिच्या म्हाडा क्वार्टर परिसरात गेला होता. या संदर्भात तरुणीच्या दोन्ही भावांना माहिती समजताच त्यांनी मित्राच्या मदतीने कमलेशवर चाकूने वार करून त्याची हत्या केली. याप्रकरणी कपील नगर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दोघांचा शोध सुरू केला आहे.
मृतक आणि अल्पवयीन तरुणींची होती मैत्री