महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

VIDEO: एटीएममध्ये तांत्रिक बिघाड, 500 रुपये विड्रॉल केल्यानंतर निघाले अडीच हजार रुपये - एटीएम समस्या खापरखेडा

जिल्ह्यातील खापरखेड्यात अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएम मशीनमधून ( Technical problem in axis bank ATM Khaperkheda ) पाचशे रुपये विड्रॉल केल्यानंतर अडीच हजार रुपये निघत असल्याने पैसे काढण्यासाठी अनेकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच एटीएम सेंटर बंद करण्यात आले.

technical problem in axis bank atm khaperkheda nagpur
एटीएम

By

Published : Jun 15, 2022, 12:52 PM IST

नागपूर - जिल्ह्यातील खापरखेड्यात अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएम मशीनमधून ( Technical problem in axis bank ATM Khaperkheda ) पाचशे रुपये विड्रॉल केल्यानंतर अडीच हजार रुपये निघत असल्याने पैसे काढण्यासाठी अनेकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच एटीएम सेंटर बंद करण्यात आले.

पैसे काढतानाचे दृश्य

हेही वाचा -OBC Reservation Issue : आरक्षण मुद्यावर राज्य सरकारचा केवळ टाईमपास सुरू - चंद्रशेखर बावनकुळे

सोमवारी रात्री हा प्रकार घडला. एका तरुणाने पाचशे रुपयांचे विड्रॉल केल्यानंतर त्याच्या हातात पाचशेऐवजी अडीच हजार रुपये पडले. त्यानंतर त्याने हा प्रकार काहींना सांगितला. त्यानंतर त्यांनी देखील पाचशे रुपयांचे विड्रॉल केल्यानंतर अडीच हजार रुपये निघत असल्याचे स्पष्ट होताच एटीएम सेंटर बाहेर मोठी गर्दी जमा झाली होती. मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पाचशे ऐवजी अडीच हजार रुपये निघत असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना मिळताच टेक्निकल टीमने एटीएम सेंटरमध्ये जाऊन तांत्रिक अडचण दूर केली. मशीनमध्ये आलेला तांत्रिक बिघाड दूर करण्यात आला आहे. पैसे काढणाऱ्या एटीएम धारकांचा डाटा काढून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्यात येणार आहेत.

हेही वाचा -SPECIAL REPORT : डीबीटीमुळं कृषी अवजार निर्मिती उद्योग डबघाईला, आत्मनिर्भर उद्योजकांची दयनीय अवस्था

ABOUT THE AUTHOR

...view details