महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nagpur Youth Murder : नागपुरात अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या; संशयीतांना पोलिसांनी घेतले ताब्यात - 22 वर्षीय तरुणाची हत्या

अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या करण्यात आली आहे. विजय असे मृतकाचे नाव आहे. विजय हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. विजय घरात असताना आरोपींनी त्याच्या छातीवर धारधार शस्त्रांनी वार करून त्याची हत्या केली आहे. पोलिसांनी विजयच्या हत्ये प्रकरणी काही संशयास्पद आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. अनैतिक संबंधातून विजयची हत्या झाल्याचे देखील निष्पन्न झाले आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Nagpur Youth Murder
Nagpur Youth Murder

By

Published : May 9, 2022, 5:09 PM IST

नागपूर -नागपूर शहरातील गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भालदारपुरा स्वीपर कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका तरुणाची निर्घृण हत्या झाली आहे. विजय अंकुश तायवाडे (२२) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. मृतक विजय हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. विजय घरात असताना आरोपींनी त्याच्या छातीवर धारधार शस्त्रांनी वार करून त्याची हत्या केली आहे. पोलिसांनी विजयच्या हत्ये प्रकरणी काही संशयास्पद आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. अनैतिक संबंधातून विजयची हत्या झाल्याचे देखील निष्पन्न झाले आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मृतक विजय तायवाडे यांच्या घरा शेजारी राहणाऱ्या एका विवाहित महिलेसोबत त्याचे अनैतिक संबंध होते. याची कुणकुण त्या महिलेच्या नवऱ्याला लागली होती. यावरून त्याच्यात वाद देखील सुरू होते. मात्र विजय ऐकायला तयार नसल्याने आरोपीने मित्रांच्या मदतीने विजयच्या घरात घुसुन त्याची निर्घृण हत्या केली. हत्येची माहिती समजताच गणेशपेठ पोलीसांनी घटनास्थळ गाठले आणि घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.


शनिवारी होणार होती हत्या :अनैतिक संबंधामुळे गेल्या काही दिवसांपासून आरोपी आणि मृतक विजयमध्ये संघर्ष वाढला होता. विजयला संपवण्यासाठी आरोपीने आपल्या मित्रांची मदत घेतली होती. शनिवारी आरोपी आणि विजय यांच्यात पुन्हा भांडण झाले होते. त्यावेळी विजय पळून गेल्याने वाचला होता. मात्र अखेर आरोपींनी त्याला गाठून त्याची हत्या केली आहे.

हेही वाचा -Raid on Gambling Wardha : भाजपा आमदाराची जुगार अड्ड्यावर धाड; पोलिसांच्या कारभारावर व्यक्त केली नाराजी

ABOUT THE AUTHOR

...view details