महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागपुरात गुरुवारी आढळले १९ नवीन कोरोनाबाधित, तर ८ रुग्ण झाले कोरोनामुक्त

गुरुवारी मेयो रुग्णालयातून ८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या ३११ इतकी झाली आहे.

nagpur corona
nagpur corona

By

Published : May 22, 2020, 10:48 AM IST

नागपूर - गेल्या २४ तासात नागपुरात १९ लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागपुरातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४०६ झाली आहे. यामध्ये मोमीनपुरा व गड्डीगोदाम येथील रुग्णांचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण आधीच क्वारंटाईनमध्ये आहेत.

गेल्या दोन दिवसात गड्डीगोदाम या परिसरातील रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने कोरोनाचा नवीन हॉटस्पॉट म्हणून पुढे येत आहे. याशिवाय गुरुवारी मेयो रुग्णालयातून ८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या ३११ इतकी झाली आहे. शिवाय गुरुवारपर्यंत कोरोनामुळे सात रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. आता नागपूरच्या मेयो आणि मेडिकल या दोन शासकीय रुग्णालयात ८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details