नागपूर -शहरात १६७ धोकादायक इमारती आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने अशा इमारतींना पाडण्यासाठी आणि डागडुजी करण्यासाठी घरमालकांना नोटीस बजावली आहे. मात्र, या नोटीस विरोधात इमारतीचे घरमालक न्यायालयात गेले आहेत.
नागपूरात १६७ इमारती धोकादायक, इमारती पाडण्याचा मनपाच्या नोटीस विरोधात घरमालक न्यायालयात - Nagpur Municipal Corporation
मुंबई आणि पुण्यात धोकादायक इमारती कोसळून २० पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नागपूर पालिकेने धोकादायक इमारती पाडण्याचा आणि त्याची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई आणि पुण्यात धोकादायक इमारती कोसळून २० पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला. याची पुनरावृत्ती नागपूरात काही ठिकाणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने इमारती पाडण्याचा आणि त्याची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरात धोकादायक इमारतींची संख्या जास्त आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या इमारतीत अजून ही लोक राहतात तर काही ठिकाणी व्यवसाय देखील सुरू आहे. या धोकादायक इमारती कधीही कोसळून यात लोकांचा जीव जावू शकतो. मात्र, तरीही काही लोक मनपाच्या नोटिसी विरोधात न्यायालयात गेले आहेत. ते धोकादायक इमारती पाडण्याचा विरोध करत आहेत. मात्र, तरीही काही इमारती पाडण्याचे काम मनपाकडून सुरू आहे.