नागपूर शहरात पुन्हा एक सेक्सटोर्शनची घटना उजेडात आली आहे. शहरातील राणा प्रताप नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार दाखल झाली आहे. अज्ञात तरुणीने वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित डॉक्टरला धमकावून १६ लाख रुपये उकळले. त्यानंतर तक्रार डॉक्टरने पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्याआधारे पोलिसांनी आरोपी तरुणीचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून सायबर तज्ज्ञांची मदत घेत आहेत.
Nagpur Sextortion तरुणीचा नामांकित डॉक्टरला अश्लील व्हिडिओ कॉल, ब्लॅकमेल करत साथीदारांच्या मदतीने उकळले १६ लाख रुपये - नागपूर सेक्सटोर्शन
अज्ञात तरुणीने वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित डॉक्टरला धमकावून १६ लाख रुपये उकळले. त्यानंतर तक्रार डॉक्टरने पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्याआधारे पोलिसांनी आरोपी तरुणीचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून सायबर तज्ज्ञांची मदत घेत आहेत.
उत्सुकतेपोटी डॉक्टरने तिच्याशी केले चॅटिंग या प्रकरणातील तक्रारदार डॉक्टरने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार जुलै महिन्यात त्यांच्या मोबाईलवर एका तरुणीचा मॅसेज आला. उत्सुकतेपोटी डॉक्टरने तिच्याशी चॅटिंग करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू त्या आरोपी तरुणीने डॉक्टरला आपल्या जाळ्यात ओढले आणि अश्लील चॅटिंग सुरू केली. त्यानंतर अश्लील व्हिडिओ कॉल करून त्याचे रेकॉर्डिंग केले. डॉक्टर आरोपी तरुणीच्या जाळ्यात अडकल्यानंर तिने पैसे उकळायला सुरुवात केली. पहिल्यांदा डॉक्टरकडे १० हजार रुपयांची मागणी केली. डॉक्टरने तिला ते पैसे मदत म्हणून पाठविले. त्यानंतर तिने डॉक्टरला आणखी पैशांची मागणी केली व त्याचे व्हिडिओ छायाचित्र 'सोशल मीडिया'त व्हायरल करण्याची धमकी दिली . डॉक्टरने बदनामीच्या भीतीपोटी ६ लाख रुपये पाठविले. त्यानंतर त्या तरुणीचे अन्य साथीदार सुद्धा डॉक्टरला धमकावून पैश्याची मागणी करू लागले होते. डॉक्टरने त्यांना देखील पाच लाख रुपये दिल्यानंतर सुद्धा आरोपी धमकावत असल्याने अखेर डॉक्टरने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलीस अधिकारी असल्याचे सांगून उकळले 5 लाख आरोपी तरूणी आणि तिच्या साथीदारांनी ११ लाख रुपये उकळ्यानंतर दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचा अधिकारी बोलत आल्याचा एक फोन डॉक्टरला आला. त्याने सुद्धा अटकेची भीती दाखविली. घाबरलेल्या डॉक्टरने त्याच्या खात्यात ५ लाख वळते केले. तीन गुन्हेगारांनी मिळून त्यांच्याकडून सव्वा सोळा लाख रुपये उकळले.