नागपूर - कोरोना बधितांची संख्या प्रतिबंधात्मक उपाययोजने नंतर कमी होईल, अशी आशा होती. पण मागील 9 दिवसात एकही दिवस हजारपेक्षा कमी रुग्ण आढळून आले नाहीत. यात पूर्व विदर्भात 1661 तर नागपूर जिल्ह्यात 1338 रुग्ण आढळून आले आहे. यात चंद्रपुर, गोंदिया, वर्धा नागपूर या चार जिल्ह्यात 10 जणांचा मृत्यूची नोंद करण्यात आली.
10 जणांचा मृत्यू-
पूर्व विदर्भात मंगळवारी पुन्हा शंभर रुग्णाची भर पडली असून सोमवारी 1561 तर मंगळवारी 1661 कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यात 1338 नवे कोरोना बाधित मिळून आले. तेच पूर्व विदर्भात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. यात नागपूर जिल्ह्यात 6, चंद्रपूर, गोंदियात प्रत्येकी एक, तर वर्ध्यात दोघांचा कोरोनाने बळी गेला आहे. यात ऍक्टिव्ह रुग्ण 11 हजार 411 जणांचा बळी गेला. यात 9202 हे शहरी भागातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आहे.