नागपूर - शहरातील अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंद्रमनी नगर येथे राहणाऱ्या 13 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. विद्यार्थिनीने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.
विद्यार्थीने आत्महत्या करण्याच्या संदर्भात काही मजकूर तिच्या नोट बुकमध्ये लिहून ठेवला आहे. ही विद्यार्थिनी माउंट कर्मेल शाळेत ( Mount Carmel School suicide ) आठव्या वर्गात शिकत होती. ती गेल्या काही महिन्यांपासून मानसिक तणावात ( student suicide due to stress ) होती. ती कुटुंबातील कुणाशी फारसी बोलत नव्हती. ती आपल्याच विश्वात रमलेली असायची. तिच्या वागण्यात बदल झाल्यानंतरदेखील तिच्या कुटुंबियांनी फारसे लक्ष दिले नाही. अखेर तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती समजताच अजनी पोलिसांनी घटनास्थळ गाठून विद्यार्थिनीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे.
विद्यार्थिनीच्या नोटबुकमध्ये काय आहे? -
विद्यार्थिनीने आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी सुसाईड नोट शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिच्या एका नोटबुकमध्ये धक्कादायक मजकूर लिहिलेला आढळून आला आहे. त्यामध्ये तिने मला मृत्यू आवडतो, असे म्हटले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून मला मृत्यूने कवेत घ्यावे, अशा आशयाचे काही मजकूर लिहिलेले आहेत. तिने नोटबुकमध्ये लिहिले आहे, उम्मीद किसी से नही, ना माँ बाप ना किसी से, कुछ भी कहो, मेरा ऐम मरना है. मैं तकलीफ मु हु मुझे मरने दो. नही करते मुझे कोई फोन,मेरी जिंदगी नरक,जिंदा रहू या मर जाऊ किसे पड़ता है फरक, मेरी नस मैं काट लू या जहर मैं गटक लू, थोड़ा सा होगा दर्द ही फिर दर्द ही खत्म. हे नोटबुक पोलिसांनी जप्त करत चौकशीला सुरुवात केली आहे.