महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nagpur News : गंमत म्हणून गळफास घेतल्याने 11 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू - Nagpur latest News

नागपूर जिल्हातील खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक दुर्देवी घटना घडली आहे. घराशेजारी एका दारुड्याला गळफास लावून आत्महत्या करताना बघून, एका चिमुकल्याने देखील तशीच कृती करण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे 11 वर्षीय चिमुकल्याचा गळफास लागल्याने मृत्यू झाला आहे.

११ वर्षीय चिमुकला
११ वर्षीय चिमुकला

By

Published : Jun 3, 2022, 11:48 AM IST

नागपूर: घराशेजारी एका दारुड्याला गळफास लावून आत्महत्या करताना बघून, एका चिमुकल्याने देखील तशीच कृती करण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे 11 वर्षीय चिमुकल्याचा गळफास लागल्याने मृत्यू ( 11-year-old boy dies of strangulation ) झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना नागपूर जिल्हातील खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. साहिल मेश्राम असे या दुर्दैवी बालकाचे नाव आहे.

साहिल ( Sahil Meshram dies ) हा नागपूर जिल्ह्यातील खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या दफई किरणापूरमध्ये येथे राहत होता. साहिलच्या घरा शेजारी राहणाऱ्या अनिल नेवारे नामक इसमाला त्याने दारूच्या नशेत गळफास घेताना पाहिले होते. त्याचे अनुकरण करत गंमत म्हणून साहिलनेही गळफास लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच त्याचा गळफास लागल्याने मृत्यू झाला. खापा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

हेही वाचा -Mohan Bhagwat on Gyanvapi : राममंदिरा नंतर आता आम्हाला आंदोलन करायचे नाही - मोहन भागवत

ABOUT THE AUTHOR

...view details