नागपूर - बुधवारी दिवसभरात नागपुरात ११ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३१५ वर पोहचली आहे. यात ३ गर्भवती महिलांचा समावेश आहे.
नागपुरात बुधवारी दिवसभरात कोरोनाबाधितांची संख्या ११ ने वाढली, सहा रुग्णांना डिस्चार्ज - 11 नवीन कोरोना रुग्ण नागपूर
बुधवारी पॉझिटिव्ह आलेले सर्व कोरोनाबाधित रुग्ण हे नागपुरातील मोमीनपुरा व सतरंजीपुरा परिसरातील आहेत. सोबतच बुधवारी ६ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या शंभरी पार होऊन १०६ एवढी झाली आहे.
![नागपुरात बुधवारी दिवसभरात कोरोनाबाधितांची संख्या ११ ने वाढली, सहा रुग्णांना डिस्चार्ज corona in nagpur](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7189113-1004-7189113-1589439504131.jpg)
corona in nagpur
बुधवारी पॉझिटिव्ह आलेले सर्व कोरोनाबाधित रुग्ण हे नागपुरातील मोमीनपुरा व सतरंजीपुरा परिसरातील आहेत. सोबतच बुधवारी ६ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या शंभरी पार होऊन १०६ एवढी झाली आहे.
नागपुरातील कोरोनाचे सर्वात मोठे हॉटस्पॉट असलेल्या मोमीनपुरा आणि सतरंजीपुरा भागातून अजूनही कोरोनाबाधित रुग्ण पुढे येतच आहेत. त्यामुळे नागपुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. त्याच तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे.