नागपूर - डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत शहरात मनपाद्वारे झोननिहाय सर्वेक्षण कार्य सुरू आहे. याअंतर्गत घरांघरांमध्ये जाऊन मनपा पथकाद्वारे तपासणी केली जात आहे. डेंग्यू संदर्भात आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. १६ जुलै ते ३१ जुलै दरम्यान स्वच्छता कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार ९८ हजार घरांपैकी ५९२९ घरे ही दुषित आढळली आहेत. म्हणजे, या घरांमध्ये डेंग्यूअळी आढळून आल्याची नोंद झाली आहे. धक्कादायक म्हणजे सर्वेक्षणामध्ये १०६४ ताप असलेले रुग्ण आढळून आले आहेत. तर, २६४७ जणांच्या रक्ताचे नमुने तर १४९ जणांचे रक्तजल नमुने घेण्यात आले आहेत.
५४०८ कुलर्समध्ये आढळली डासअळी -
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच गेल्या महिन्यापासून नागपूर शहरात आणि जिल्ह्यात डेंग्युच्या आजाराने डोकेवर काढले आहे. शेकडोंच्या संख्येने डेंग्यूच्या तापाने रुग्ण फनफनत असल्यामुळे नागपूर महानगरपालिकेने सर्व घरांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. सर्वेक्षणादरम्यान ३८ हजार ३४० घरांमधील कुलर्सची तपासणी करण्यात आली. त्यात ५४०८ कुलर्समध्ये डासअळी आढळून आल्या आहेत. मनपाच्या चमूद्वारे २३२९ कुलर्स रिकामे करण्यात आले आहेत. ११ हजार ४७८ कुलर्समध्ये १ टक्का टेमिफॉस सोल्यूशन तर २१ हजार ४८९ कुलर्समध्ये २ टक्के डिफ्लूबेंझ्युरोम गोळ्या टाकण्यात आल्या आहेत. तसेच, ३०४४ कुलर्समध्ये गप्पी मासे टाकण्यात आले.
नागपूर शहराला डेंग्यूचा विळखा -