नागपूर - वर्षभर शेतीत राबणाऱ्या बैलांच्या प्रति सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा. संपूर्ण राज्यात पोळ्याचा सण उत्साहात साजरा केला जातो. मात्र विदर्भात तान्हा पोळ्याची धूम असते. विशेषतः पोळ्याच्या पाडव्याला पूर्व विदर्भातील सर्व सहा जिल्ह्यात तान्हा पोळा देखील साजरा करण्याची ऐतिहासिक परंपरा आहे. विदर्भ आणि विदर्भाबाहेर देखील ही संस्कृती रुजायला सुरुवात झाली आहे. तान्हा पोळा या सणाचे लहान मुलांमध्ये महत्व आहे. पोळ्याच्या पाडव्याला लाकडी बैलांची मिरवणूक काढली जात आहे.
तान्हा पोळा - अबब!! सव्वा लाखाचा नंदी - pola festival
नागपूरच्या लकडगंज भागातील टिंबर मार्केट मधील एका कारागीराने रोजच्या कामातून वेळ काढून एक चार फुटांचा मोठा नंदी बैल तयार केला आहे. ज्याची किंमत सव्वा लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.
नागपूरच्या लकडगंज भागातील टिंबर मार्केट मधील एका कारागीराने रोजच्या कामातून वेळ काढून एक चार फुटांचा मोठा नंदी बैल तयार केला आहे. ज्याची किंमत सव्वा लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. सुमारे आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी यासाठी लागला आहे.
लहान मुलांनी बनवला नंदीबैल
किसन शाहू नामक तरुणाने हा आकर्षक आणि रुबाबदार नंदीबैल तयार केला आहे. विक्रीसाठी ठेवलेला बैल ग्राहकांना आकर्षित करत आहे. लकडगंज परिसरातील लहान मुले तर बैल बघण्यासाठी आले आहेत. तान्हा पोळा साजरा करण्याची नागपुरची परंपरा आणि संस्कृती असल्याने दरवर्षी एक आकर्षक नंदीबैल बनवणार असल्याचेही तो म्हणाला. या बैलाची किंमत सव्वा लाख रुपये आहे.
तान्हा पोळा उत्सव
१८०६ साली तान्हा पोळा या सणाचा उत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. पोळ्याच्या सणाला बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. यात लहान मुलांचा देखील सहभाग असावा या उद्देशाने रघुजी राजे भोसले (द्वितीय) यांना तान्हा पोळा साजरा करण्याची कल्पना सुचली. त्यामुळे दोन शतकांची परंपरा लाभली आहे.
हेही वाचा -दाभोलकर हत्या प्रकरण: पाचही प्रकरणात यूएपीए कायदा लागू करा, सीबीआयची न्यायालयाकडे मागणी