महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Local Body Elections : जिल्हा परिषद, महापालिका निवडणूक दोन आठवड्यात जाहीर करा.. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या प्रलंबित निवडणुका ( Local Body Elections ) दोन आठवड्यात जाहीर करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले ( Supreme Court Ordered State Government ) आहेत यामुळे राज्य सरकार पुन्हा एकदा अडचणीत आले आहे ओबीसी आरक्षणाचा ( OBC Reservation ) तिढा अद्याप सुटलेला नाही.

supreme court
सर्वोच्च न्यायालय

By

Published : May 4, 2022, 1:55 PM IST

Updated : May 4, 2022, 3:13 PM IST

मुंबई :राज्य सरकारने लांबणीवर टाकलेल्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या ( Local Body Elections ) तारखा जाहीर कराव्यात, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. यामुळे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या मार्ग मोकळा झाला आहे. मात्र राज्य सरकारला हा खूप मोठा फटका बसला आहे. राज्य सरकारने ओबीसी आरक्षणासाठी ( OBC Reservation ) विधेयक आणून निवडणुकांच्या तारखा स्वतः जाहीर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारने नवीन आयोग नेमला आणि आयोगामार्फत डाटा गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र हे काम कधी होणार याबाबत अद्याप स्पष्ट नसल्याने निवडणुकांच्या तारखा राज्य सरकारने जाहीर केलेल्या नाहीत. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात आज झालेल्या सुनावणीत राज्य सरकारने दोन आठवड्यात निवडणुकांच्या तारखा जाहीर कराव्यात, असे निर्देश दिल्याने सरकार पुन्हा एकदा अडचणीत आले ( Supreme Court Ordered State Government ) आहे.


ही राज्य सरकारची अक्षम्य चूक - हरिभाऊ राठोड :राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाबाबत अक्षम्य दिरंगाई केली आहे. स्वतःला ओबीसी चे नेते म्हणवून घेणाऱ्या अनेक नेत्यांशी आम्ही संपर्क साधला. मात्र त्यांनी त्याबाबत गांभीर्याने विचार केला नाही. राज्य सरकारने सातत्याने याबाबत चालढकल केली. आज अनेक नेते हे कोणी महापौर झाले असते, कोणी सभापती झाले असते, कुणी जिल्हा परिषद अध्यक्ष झाले असते. मात्र ओबीसी आरक्षण वगळल्याने ते या पदापासून वंचित आहेत. आता पुन्हा एकदा न्यायालयाने निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हे सर्व कार्यकर्ते वंचित राहतील आणि ही राज्य सरकारची चूक आहे, असा आरोप ओबीसी नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केला ( Haribhau Rathod On OBC Reservation ) आहे.


न्यायालयाचा निकाल हाती आल्यावर निर्णय - जयंत पाटील :सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पूर्णपणे हातात आल्यानंतर त्याची कारणमीमांसा बघितल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणार आहे. मात्र निवडणुका कराव्यात असा त्यांनी आदेश दिला आहे, असे मी आत्ताच ऐकले आहे. ओबीसींना आरक्षण मिळावे म्हणून तर राज्य सरकारने कायद्यात काही बदल केले. आता सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिलेला आहे. ज्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांची मुदत संपली आहे त्याबाबत न्यायालयाने निर्णय दिला आहे, असे वाटते. निर्णय हाती आल्यानंतरच याबाबत आम्ही आमची भूमिका स्पष्ट करु, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : OBC Reservation : ओबीसींच्या नव्या विधेयकातही पेच! सरकारची डोकेदुखी वाढली

Last Updated : May 4, 2022, 3:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details