महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

जैद आणि बासितकडून सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल - narcotics control bureau

सुशांतसिंह राजपूत प्रकरणी तपास करत असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून अटक करण्यात आलेले जैद विलंत्री व बासित परिहार या दोघांकडून सत्र न्यायालयामध्ये जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा या दोघांच्या वकिलांनी केला आहे.

sushant singh rajput suicide
जैद व बासित कडून सत्र न्यायालयात जामीन याचिका दाखल

By

Published : Sep 7, 2020, 12:58 PM IST

मुंबई - सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी तपास करत असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून अटक करण्यात आलेले जैद विलंत्री व बासित परिहार या दोघांकडून सत्र न्यायालयामध्ये जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा या दोघांच्या वकिलांनी केला आहे.

जैद व बासित कडून सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून करण्यात येणाऱ्या तपासादरम्यान सॅम्युअल मिरांडा याला अंमलीपदार्थांचा पुरवठा जैद करीत असल्याचा दावा एनसीबीने केला आहे. सॅम्युअल मिरांडाच्या माध्यमातून जैदकडून अंमलीपदार्थ शोविक चक्रवर्ती मिळवत होता. यासाठी शोविक हा सॅम्युअलला रोख रक्कम देत होता. सुशांतच्या मृत्यूनंतर शोविक चक्रवर्तीने सॅम्युअलच्या माध्यमातून अंमलीपदार्थ मिळवल्याचे जैदच्या चौकशीतून समोर आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details