महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Collages Marathi names : महाविद्यालयांची नावे मराठीत लिहा, युवासेनेची मागणी - महाविद्यालये मराठी नावे युवासेना मागणी

मुंबई विद्यापीठाच्या धर्तीवर राज्यातील सर्वच महाविद्यालयांची नावे ( Collages Marathi names ) ठळक अक्षरात मराठी भाषेत ( Yuvasena demand on collages marathi names ) प्रवेशद्वारावर लावण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन युवासेनेच्यावतीने ( Yuvasena on names of colleges in Marathi ) उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांना देण्यात आले.

Yuvasena demand on collages marathi names
महाविद्यालये मराठी नावे युवासेना मागणी

By

Published : Apr 21, 2022, 10:17 AM IST

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या धर्तीवर राज्यातील सर्वच महाविद्यालयांची नावे ( Collages Marathi names ) ठळक अक्षरात मराठी भाषेत ( Yuvasena demand on collages marathi names ) प्रवेशद्वारावर लावण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन युवासेनेच्यावतीने ( Yuvasena on names of colleges in Marathi ) उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांना देण्यात आले. सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, शशिकांत झोरे, शीतल शेठ-देवरुखकर आणि कणकवली जिल्हा युवासेना ( Yuvasena news ) विभाग अधिकारी सुशांत नाईक यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा -Today's Gold and Silver Rates : जाणून घ्या, राज्यातील आजचे सोने आणि चांदीचे दर...

मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयांची नावे मराठीत लिहिण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी युवासेनेच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली. महाविद्यालयांच्या मराठी नावासह प्रवेश अर्ज, माहितीपत्रक, सूचना फलकही मराठीत असावे. तसेच, 27 फेब्रुवारी ‘मराठी भाषा दिवस’ मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात यावा, असे निवेदन युवासेनेच्या वतीने देण्यात आले.

हेही वाचा -भाजपाच्या पोलखोल सभेत सेनेची तोडफोड सुरूच; आता दहिसरमधील काढला स्टेज

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details