मुंबई - भारतात सुमारे 12 हजार लोकांना दररोज उपचारासाठी आवश्यक रक्त मिळत नाही. त्यामुळे देशात दरवर्षी सुमारे अनेक रूग्णांचा मृत्यू होतो. दिल्लीतील सामाजिक कार्यकर्ते किरण वर्मा यांनी रक्तदानाविषयी जनजागृती करण्यासाठी देशभर पदयात्रा काढण्याचे ठरवले असून सध्या त्यांची ही वारी मुंबईत पोहोचली आहे. देशभरात रक्तदानाविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी भारत भ्रमणाला निघालेल्या किरण वर्मा यांनी आतापर्यंत देशभरात 35,000 किमीहून अधिक प्रवास केला आहे. त्यांनी २८ डिसेंबर 2021 पासून केरळची राजधानी तिरुअनंतपुरम येथून पदयात्रा सुरू केली. वर्मा यांनी चेंज विथ वन फाऊंडेशनची स्थापना केली आहे. याद्वारे ते सिम्पली ब्लड आणि चेंज विथ वन मील नावाचे दोन कार्यक्रम चालवतात, एक आभासी रक्तदान मंच. योग्य वेळी रक्त पोहोचवून आतापर्यंत 35000 लोकांचे प्राण वाचवल्याचा त्यांचा दावा आहे.
कोरोनामुळे रक्तदानात प्रचंड घट -वर्मा म्हणाले की, कोणत्याही व्यक्तीद्वारे चालवलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा जनजागृती कार्यक्रम आहे. जो दोन वर्षांहून अधिक काळ सातत्याने चालत आहे. 31 डिसेंबर 2025 नंतर रक्त न मिळाल्याने देशात कोणाचाही मृत्यू होऊ नये, हे त्यांचे ध्येय असल्याचे वर्मा सांगतात. कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने गेल्या दोन वर्षांत देशात रक्तदानात घट झाली आहे. कठीण परिस्थितीतही रक्तदान करत राहण्यासाठी लोकांना जागृत करणे हा त्यांच्या पदयात्रेचा उद्देश आहे. त्यामुळे रुग्णालये आणि रक्तपेढ्यांकडे आवश्यक रक्ताचा तुटवडा नाही. देशात उपचारासाठी लागणाऱ्या रक्ताचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर किरण वर्मा यांनी सिम्पली ब्लडची स्थापना करण्याचा निर्णय घेतला.