मुंबई- धावत्या रेल्वेत स्टंट करणे एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची घटना मुंबईतील वडाळा ते जीटीबी दरम्यान घडली आहे. धावत्या रेल्वेच्या दरवाजावर उभे राहून तो स्टंट करण्याचा प्रयत्न करत होता. त्या दरम्यान रेल्वे रुळाच्या बाजूला असणाऱ्या खांबाला धडकून अपघात झाला. या अपघात तो गंभीर जखमी झाला आहे.
धावत्या रेल्वेत स्टंट करणे पडले महागात, खांबाला धडकून तरुण गंभीर - youth injured when perform
अपघातानंतर जखमी युवकाला रेल्वे रुळाच्या बाजूला राहणाऱ्या स्थानिक नागरिकांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले आहे. जखमी युवकाची ओळख पटलेली नसून, त्याची प्रकृती गंभीर आहे.

जखमी तरुणाला रुग्णालयात नेताना
धावत्या रेल्वेत स्टंट करणे पडले महागात, खांबाला धडकून तरुण गंभीर
मंगळवारी रात्री घडेल्या या अपघातानंतर जखमी युवकाला रेल्वे रुळाच्या बाजूला राहणाऱ्या स्थानिक नागरिकांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले आहे. जखमी युवकाची ओळख पटलेली नसून, त्याची प्रकृती गंभीर आहे.
या पूर्वीही अशा प्रकारे स्टंट करण्याच्या घटना समोर आल्या आहेत रेल्वे पोलिसांकडून अनेकदा कारवाई करण्यात येते. मात्र, तरुणाकडून अशा प्रकारचे जीव घेणे प्रकार सुरूच असल्याचे समोर आले आहे.
Last Updated : Nov 13, 2019, 11:24 AM IST