मुंबई- काँग्रेस आणि जेडीएसच्या राजीनामा दिलेल्या आमदारांना पवईच्या रेनिसन्स हॉटेलमध्ये जबदरस्ती ठेवले आहे. आम्हाला त्यांना भेटू द्या, असे म्हणत काँग्रेस कार्यकर्त्यांनी हॉटेलबाहेर जोरदार निदर्शने केली. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आमदारांना भेटण्याच्या मागणीवर ठाम असल्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे या भागात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
युवक काँग्रेसचे रेनिसन्स हॉटेलबाहेर आंदोलन; पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात - पोलीस
कर्नाटकच्या आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर मुंबई गाठली होती. मागील काही दिवसांपासून ते मुंबईत वास्तव्यास आहेत. हे आमदार परत जावे, यासाठी आज युवक काँग्रेसच्या माध्यमातून हॉटेल परिसरात जोरदार आंदोलन करण्यात आले.
कर्नाटकच्या आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर मुंबई गाठली होती. मागील काही दिवसांपासून ते मुंबईत वास्तव्यास आहेत. हे आमदार परत जावे, यासाठी काँग्रेसतर्फे अनेकदा आंदोलन करण्यात आले. परंतु, हे बंडखोर आमदार मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहेत. दरम्यान, आज पुन्हा युवक काँग्रेसच्या माध्यमातून हॉटेल परिसरात जोरदार आंदोलन करण्यात आले.
यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण हे आंदोलनकर्ते ऐकण्यास तयार नसल्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करत या आंदोलकांना त्याब्यात घेतले आहे. भाजप सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर करत आहे, असा आरोप यावेळी आंदोलन करण्याऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला.