महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Rahul Gandhi Marriage : आता तरी राहुल गांधींनी लग्न करावं; तरुणाचा थेट बाळासाहेब थोरातांना फोन - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात

Rahul Gandhi: काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी Congress Party MP Rahul Gandhi सध्या भारत जोडो यात्रा Bharat Jodo Yatra करत आहेत. कन्याकुमारी पासून तर जम्मू कश्मीरपर्यंत असा त्यांचा हा 'भारत जोडो' यात्रेचा प्रवास असणार आहे. मात्र राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेमध्ये व्यस्त आहेत. तरी, औरंगाबादच्या एका तरुणाला राहुल गांधी यांच्या लग्नाचा प्रश्न सतावत आहे.

Balasaheb Thorat
Balasaheb Thorat

By

Published : Oct 7, 2022, 10:40 PM IST

मुंबई: काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी Congress Party MP Rahul Gandhi सध्या भारत जोडो यात्रा Bharat Jodo Yatra करत आहेत. कन्याकुमारी पासून तर जम्मू कश्मीरपर्यंत असा त्यांचा हा 'भारत जोडो' यात्रेचा प्रवास असणार आहे. मात्र राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेमध्ये व्यस्त आहेत. तरी, औरंगाबादच्या एका तरुणाला राहुल गांधी यांच्या लग्नाचा प्रश्न सतावत आहे.

थेट बाळासाहेब थोरातांना फोन -भारत जोडो नाही, तर राहुल गांधी यांनी घर जोडो केलं पाहिजे. राहुल गांधी यांचे वय वाढत चालला आहे. म्हणून त्यांनी आता लवकरात लवकर लग्न करावं असा फोनच औरंगाबादच्या या तरुणाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Senior Congress leader Balasaheb Thorat यांना केला आहे. रमेश पाटील असे या तरुणाचं नाव असून बाळासाहेब थोरात आणि रमेश पाटील यांच्यामध्ये झालेलं फोनवरील हे संभाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राहुल गांधी यांचे लग्न आता व्हायला पाहिजे.

हे या फोनच्या संभाषणातून बाळासाहेब थोरात यांना पटवून देण्याचे काम हातरून करत आहे. भले कोणत्याही जाती धर्माची समाजाची तरुणी असो, त्या तरुणीशी राहुल गांधी यांनी लग्न केलं पाहिजे. लग्न केल्यामुळे वैवाहिक जीवन काय असतं ? ते देखील राहुल गांधी यांना समजू शकेल, असे सांगण्याचा प्रयत्न फोनच्या माध्यमातून तो तरुण बाळासाहेब थोरात यांना करत आहे. राहुल गांधी यांचे वय जवळपास आता पन्नाशीत आल आहे. त्यामुळे काही काळानंतर त्यांना लग्नासाठी मुलगी ही मिळणार नसल्याची चिंता व्यक्त करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details