मुंबई- मुंबईतील मिठी नदीत एकाने उडी घेतल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी पोलीस पोहचले असून शोधकार्य सुरु आहे. तरुणाने नदीत उडी का घेतली याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
मुंबईतील मिठी नदीत एकाने घेतली उडी; पोलिसांचे शोधकार्य सुरु - हर्षद कुरेशी
एका 25 वर्षीय तरुणाने मिठी नदीत उडी घेतल्याची घडना घडली आहे. तरुणाने नदीत उडी का घेतली याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
पोलिसांचे शोधकार्य सुरु
हेही वाचा - पुन्हा मुंबईची तुंबई; दादर,वडाळा, नायगाव परिसरात पाणीच पाणी
हर्षद कुरेशी (वय 25) या तरुणाने बिकेसी परिसरातील मिठी नदीत उडी मारली. तो धारावीत राहत असल्याचे समजते. मुंबईत बुधवारी सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यातच मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यात या युवकाने उडी घेतली आहे. पोलील व हर्षदच्या मित्रांकडून शोधकार्य सुरू आहे. पोलीस चौकशीनंतर सविस्तर माहिती बाहेर येईल, असे पोलिसांनी सांगितले.