मुंबई - मुंबईतील अँटॉप हिल परिसरातील गरीब नवाज नगर येथे पोलिसांवर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची घटना समोर आलेली आहे.
अँटॉप हिल पोलिसांवर हल्ला, 3 जण जखमी - पोलिसांवर हल्ला
14 मे रोजी संध्याकाळच्या वेळेस स्थानिक पोलीस व एसआरपीएफचे काही पोलीस कर्मचारी गरीब नवाज नगर परिसरामध्ये गस्त घालत असताना काही तरुण मास्क न लावता टोळक्याने परिसरात फिरत असल्याचे समोर आले. यावेळी पोलिसांनी त्या तरुणांना मास्क का नाही लावला याबद्दल विचारले असता या तरुणांमध्ये व पोलिसांमध्ये वाद निर्माण होऊन 15 ते 17 जणांच्या टोळक्याने पोलीस अधिकाऱ्यांवर धारदार शस्त्राने हल्ला केला.

या घटनेमध्ये अँटॉप हिल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक व एसआरपीएफचे 2 जवान असे 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या संदर्भात पोलिसांनी कलम 307, 353, 144, 188नुसार गुन्हा नोंदविला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.