रायगड : रायगड जिल्ह्यातील उरण शहरातील बाजारपेठेत मोटारसायकलवर आलेल्या तरुणाने २२ वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे.( young man stabbed a sharp weapon for trivial reason ) जखमी तरुणाला नवीमुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
Uran Crime : उरणमध्ये २२ वर्षीय तरुणाच्या मानेवर धारदार शस्त्राने वार; कारण जाणून बसेल धक्का - उरणमध्ये तरूणावर हल्ला
रायगड जिल्ह्यातील उरण शहरातील बाजारपेठेत मोटारसायकलवर आलेल्या तरुणाने २२ वर्षीय तरुणाच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केला ( young man stabbed a sharp weapon for trivial reason )आहे.जखमी तरुणाला नवीमुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.रुपेश लल्लन प्रसाद (22) या आरोपी तरुणाला पोलीसांनी ताब्यात घेतले असून, यातील एक आरोपी फरार झाला आहे.
![Uran Crime : उरणमध्ये २२ वर्षीय तरुणाच्या मानेवर धारदार शस्त्राने वार; कारण जाणून बसेल धक्का Uran Crime](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16604381-thumbnail-3x2-mur.jpg)
संशयीत आरोपी ताब्यात - रविवारी रात्रीच्या सुमारास उरण शहरातील चारफाटानजीक मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात तरुणाने २२ वर्षीय ताह गुलजार शेख या तरुणावर धारदार शस्त्राने अचानक हल्ला केला. यावेळेस, जखमी ताह शेख यांच्या मानेवर वार झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. यावेळी जखमी तरुणास रुग्णालयात नेण्यात आले. तर, रुपेश लल्लन प्रसाद (22) या आरोपी तरुणाला पोलीसांनी ताब्यात घेतले असून, यातील एक आरोपी फरार झाला आहे. जखमी तरुणाला नवीमुंबईतील एमजीएम रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हल्ला करणाऱ्या आरोपीची पोलीसांकडून चौकशी करण्यात येत असून आरोपी तरूणाने किरकोळ वादातून हल्ला केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
क्षुल्लक कारणावरून हल्ला - शुल्लक कारणावरून झालेल्या भांडणातून जीवघेणा हल्ला झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, हल्ला झाल्यानंतर मुस्लिम समुदायाने आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी उरण पोलीस ठाण्याजवळ जमाव केला होता. यावेळी मुख्य आरोपी रुपेश प्रसाद याला ताब्यात घेतल्याने, परिस्थितीवर नियंत्रण आले.