मुंबई: शिवसेनेत उभी फूट (split in ShivSena) पडल्यानंतर शिंदे गट व उद्धव ठाकरे यांचा पहिलाच दसरा मेळावा (dussehra gathering) होत आहे. एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेच्या अनेक नेत्यांकडून त्यांच्यावर टीका केली जात होती. नेते फुटतात. कार्यकर्ते मात्र तिथेच असतात. अशी उत्तर शिवसेनेच्या नेत्यांकडून दिली जात होती. सध्या याचाच प्रत्यय येताना दिसतोय. कारण, एक शिवसैनिक तरुण उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी आपला व्यवसाय बाजूला ठेवून ब्राझीलवरून थेट मुंबईत आला आहे. विशेष म्हणजे या तरुणाने त्याच्या पक्ष प्रेमासाठी ब्राझीलमध्ये त्याच्या गाडीवर शिवसेनेची व्याघ्रमुद्रा लावली आहे.
...तर ब्राझीलमध्ये देखील शिवसेनाब्राझील मधल्या या कट्टर शिवसैनिक तरुणाचं नाव आहे धीरज मोरे. ईटीव्ही भारतशी बोलताना धीरज मोरे सांगतात की, मागची अनेक वर्षे मी ब्राझीलमध्ये माझ्या गाडीवर शिवसेनेची व्याघ्रमुद्रा घेऊन फिरतोय. ब्राझीलमध्ये तुम्हाला तुमच्या गाडीवर असे विविध स्टिकर लावण्यास बंदी आहे. तुम्हाला असे स्टिकर लावायचे असतील तर त्यासाठी तिथल्या प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते. त्यासाठी असणारी प्रक्रीया खूप मोठी आहे. त्यासाठी तुम्हाला तुमची सर्व कागदपत्रे घेऊन ती फॉरेन डिपार्टमेंटला पाठवावी लागतात. तसंच भारतीय दूतावासाकडून देखील त्याबाबतची परवानगी घ्यावी लागते. या सर्व परवानग्या जर तुमच्याकडे नसतील आणि जर तुम्हाला तिथल्या पोलिसांनी पकडलं तर तुम्हाला दंड भरावा लागतो. आतापर्यंत मला पकडण्यात आलेलं नाही. अजून तरी मला परवानगी मिळालेली नाही. जर, मला परवानगी मिळाली तर शिवसेनेचे चिन्ह ब्राझीलमध्ये देखील ऑफिशियल झालेलं असेल. असं धीरज मोरे म्हणतात.