मुंबई- मुलुंडमधील वसंत ऑस्कर या इमारतीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या इमारतीत राहणाऱ्या एका 22 वर्षीय तरुणाने वडील आणि आजोबांची हत्या करून आत्महत्या केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मुलुंड येथील वसंत ऑस्कर इमारतीमध्ये एका तरुणाने आपले वडील आणि आजोबा यांची चाकूने वार करून हत्या केली. त्यानंतर स्वतः सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. शार्दुल मांगले (वय 22)असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आज सकाळी ९ वाजताच्या दरम्यान त्याने त्याचे वडील मिलिंद मांगले (वय 55) आणि आजोबा सुरेश मांगले (वय 85) यांच्यावर चाकूने वार केले. यावेळी त्यांचा घरकाम करणारा अनंत कांबळे घरात होता. त्याने या लोकांना प्रथम वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, शार्दुलचे कृत्य पाहून तो स्नानगृहामध्ये कडी लावून लपला. त्यामुळे त्याने ही सर्व घटना पाहिली. सध्या घटनास्थळी मुलुंड पोलीस दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील घटनास्थळी येणार होते.
मानसिक संतुलन बिघडल्याने..?