महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

चोरी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा लोकांच्या मारहाणीत मृत्यू - mumbai crime news

सांताक्रूझ भागातील मुक्तानंद पार्क येथे एका तरूणाला स्थानिक लोकांनी चोरी करताना रंगेहात पकडले. चोराला एका खांबाला बांधून त्याला लाथा-बुक्क्याने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत चोराचा मृत्यू झाला.

stealing in Santa Cruz mumbai
तरुणाचा लोकांच्या मारहाणीत मृत्यू

By

Published : Dec 28, 2020, 9:44 PM IST

Updated : Dec 28, 2020, 9:51 PM IST

मुंबई- सांताक्रूझ भागातील मुक्तानंद पार्क येथे एका तरूणाला स्थानिक लोकांनी चोरी करताना रंगेहात पकडले. चोराला एका खांबाला बांधून त्याला लाथा-बुक्क्याने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत चोराचा मृत्यू झाला. साईजाद मेहबूब खान (वय ३० वर्ष) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी 6 जणांविरुध्द भादंवि कलम 302, 342 आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

तरुणाचा लोकांच्या मारहाणीत मृत्यू
सांताक्रूझ पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार 25 डिसेंबर रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. चोर मोबाईल चोरण्यासाठी गेला असता दोन जणांनी त्याला रंगेहाथ पकडले आणि त्याला मारहाण केली. त्यानंतर चोर घरी गेल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. मृताच्या भावाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी रविवारी रात्री 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून सर्वांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पकडलेले आरोपी सफाई कामगार आहेत.आरोपींची नावे -1)ऋषिकेश रामनिवस पासी (वय 24 वर्ष)2) हयात अब्दुल लतीफ अली ( 26वर्ष)3)अलीमुद्दीन सजरुद्दीन शेख (24 वर्ष)4). मोतीबुर रहमान अख्तर आलम (19 वर्ष)5. मस्कर आलम फरोजुद्दीन (18 वर्ष)6. पिंटूकुमार कमेश्वर साह (25 वर्ष)
Last Updated : Dec 28, 2020, 9:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details