मुंबई - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल आपल्या राज्यात "टू चाईल्ड पॉलिसी" करत असल्याची घोषणा केली. मात्र आपल्या देशातील काही राज्यात आधीपासूनच "टू चाईल्ड पॉलिसी" आहे. त्यापेक्षा योगी आदित्यनाथ यांनी "नो चाईल्ड पॉलिसी" तयार करायला हवी होती, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रात 2000 साली "टू चाईल्ड पॉलिसी" ही आधीपासूनच तयार करण्यात आली आहे. दोन मुलांपेक्षा जास्त मुलं ज्यांना आहेत, अशांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवता येत नाहीत. तसेच शासकीय योजनांचा लाभ देखील मिळत नाही. गेल्या आठवडाभरापासून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री "टू चाईल्ड पॉलिसी" आणणार असा गाजावाजा करत आहेत. मात्र महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये "टू चाईल्ड पॉलिसी" आहे. तसेच भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यातील अनेक नेत्यांना मुलं बाळंच नाहीत. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांनी 'टू चाईल्ड पॉलिसी" ऐवजी "नो चाईल्ड पॉलिसी" बनवावी. जेणेकरून ज्यांना मुलं नाहीत, त्यांना देखील पुरस्कार मिळेल असा खोचक टोला नवाब मलिक यांनी योगी आदित्यनाथ यांना लगावला. तसेच भारतीय जनता पक्षातील काही नेते नेहमीच दोन पेक्षा जास्त मुलं असावीत याचा पुरस्कार करतात. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांनी त्या नेत्यांचे ऐकून जास्त मुलांसंदर्भात पॉलिसी बनवावी, असा टोलाही लगावला आहे.
योगी आदित्यनाथांची टू-चाईल्ड पॉलिसी -