मुंबईमहाराष्ट्रात विदर्भात मुसळधार पावसाची Heavy Rain in Vidarbha शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पुढील दोन दिवस हवामान विभागाने विदर्भात येलो अलर्ट सांगितला आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता Warning For 48 Hours in Maharashtra वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आता वादळात रूपांतरित झाल्याचे आढळून आले होते. त्यामुळे राज्यात मागील दोन ते तीन दिवस मध्यम ते मुसळधार Heavy Rain in Maharashtra पाऊस झाला होता. हवामान खात्याने India Meteorological Department हा अंदाज व्यक्त केला आहे. याच काळात पुणे शहर व जिल्ह्यातही तुरळक पावसाची शक्यता आहे, असे हवामान विभागाने Meteorologist K S Hosalikar म्हटले आहे.
राज्यात आत्तापर्यंत पावसाचे प्रमाण समाधनाकारक दरम्यान, राज्यात आत्तापर्यंत पावसाचे प्रमाण समाधनाकारक राहिले आहे. जूनपासून आत्तापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. नदी आणि धरणांच्या पाणी साठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. जून महिन्यात पावसानं दडी मारली होती. मात्र, जुलै आणि ऑगस्टमध्ये राज्यात सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली होती. दरम्यान, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात मुसळधार पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं होतं. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्यानं वाहतुकीवरही परिणाम झाला होता. तसेच शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे.
कोल्हापूर पाऊसकोल्हापूर शहरासह जिल्ह्यात हलक्या सरींनी हजेरी लावली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पावसाने हजेरी लावल्याने राधानगरी धरणाचा स्वयंचलित 6 व्या क्रमांकाचा दरवाजा उघडला आहे. राधानगरी धरणातून एकूण 3 हजार 28 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची पातळी 18 फूट 11 इंचापर्यंत खाली आली आहे. जिल्ह्यातील अजूनही 12 बंधारे पाण्याखाली आहेत. दरम्यान, राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा या पावसाचे आगार असणाऱ्या तालुके सोडून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळं जिल्ह्यातील पुराचे संकट टळले आहे.