महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Yellow Alert in Maharashtra: पुढील 3 दिवस महाराष्ट्रात यलो अलर्ट, हवामान खात्याचा इशारा

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही भागांत पुढील तीन ते चार दिवस यलो अलर्ट जारी केला आहे. (Yellow alert in Maharashtra). आयएमडी मुंबईतील शास्त्रज्ञ-सी नीथा टीएस यांनी सांगितले की, जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची अपेक्षा आहे. (Heavy rain in Maharashtra)

Yellow alert in Maharashtra
Yellow alert in Maharashtra

By

Published : Oct 9, 2022, 11:26 AM IST

मुंबई: भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही भागांसाठी पुढील तीन ते चार दिवस यलो अलर्ट जारी केला आहे. (Yellow alert in Maharashtra). आयएमडी मुंबईतील शास्त्रज्ञ-सी नीथा टीएस यांनी सांगितले की, जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची अपेक्षा आहे. (Heavy rain in Maharashtra)

हवामान खात्याची महाराष्ट्राला चेतावणी: आयएमडी मुंबईतील शास्त्रज्ञ सी. नीथा टीएस यांनी सांगितले की, जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाची अपेक्षा आहे. (Heavy rain in Maharashtra). मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात पुढील 3-4 दिवसांसाठी गडगडाटी वादळाचा इशारा देण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी आणि शनिवारी वेगवेगळ्या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ तसेच हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाने सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे.

मुंबईतही पाऊस: शनिवारी मुंबई शहर तसेच पूर्व आणि पश्चिम उपनगरात अनुक्रमे 04.66 मिमी, 02.69 मिमी आणि 01.39 मिमी सरासरी पाऊस पडला. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) आणि रेल्वेच्या सार्वजनिक वाहतूक सेवा मुसळधार पावसामुळे प्रभावित झाल्या नाहीत. मध्य रेल्वेच्या प्रवक्त्याने पीटीआयला सांगितले की, तिन्ही कॉरिडॉरवरील लोकल ट्रेन सेवा सुरळीतपणे सुरू आहेत. आज मुंबईचे कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान अंदाज संस्थेने वर्तवली आहे.

देशभरात मुसळधार पावसाची शक्यता:आगामी काही दिवसांमध्ये संपूर्ण देशात विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. गुजरात मध्ये 7 ते 10 तारखे दरम्यान विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, किनारी आंध्र प्रदेश आणि यानम परिसरात 7 ते 9 रोजी तर रायलसीमा, तामिळनाडू आणि पुडुचेरी परिसरात 7 ते 11 तारखे दरम्यान पावसाची शक्यता आहे. कराईकल, उत्तर अंतर्गत कर्नाटक, दक्षिण अंतर्गत कर्नाटक व केरळ मध्ये 9 ते 11 ऑक्टोबर दरम्यान पाऊस पडू शकतो.

ABOUT THE AUTHOR

...view details