महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Beggar Free City Campaign : नववर्षाच्या मुहूर्तावर राज्यात भिकारीमुक्त शहर अभियान - यशोमती ठाकूर सक्तीचे शिक्षण अभियान

महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर ( Minister for Women and Child Development ) म्हणाल्या, की राज्यातील विविध शहरांमध्ये भिकाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली असल्याचे दिसते. शहरात विविध ठिकाणी भीक मागणाऱ्या बालकांना शैक्षणिक सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांना डे केअर सेंटर अथवा अन्य शाळांमध्ये नाव नोंदवून त्यांना सक्तीने शिक्षण देण्यात ( Yashomati Thakur on Beggar free campaign ) येणार आहे. बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांची भीक मागण्यासारख्या गुन्ह्यातून सुटका करण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अभियान सुरू करण्यात येणार आहे.

महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर
महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर

By

Published : Apr 1, 2022, 5:31 PM IST

मुंबई- मराठी नववर्षाच्या निमित्ताने राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून राज्यात भिकारी मुक्त शहर अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली.

महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर ( Minister for Women and Child Development ) म्हणाल्या, की राज्यातील विविध शहरांमध्ये भिकाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली असल्याचे दिसते. शहरात विविध ठिकाणी भीक मागणाऱ्या बालकांना शैक्षणिक सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांना डे केअर सेंटर अथवा अन्य शाळांमध्ये नाव नोंदवून त्यांना सक्तीने शिक्षण देण्यात ( Yashomati Thakur on Beggar free campaign ) येणार आहे. बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांची भीक मागण्यासारख्या गुन्ह्यातून सुटका करण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अभियान सुरू करण्यात येणार आहे.

मुलांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार-राज्यातील विविध शहरांमध्ये आपल्याला रस्त्यांवर अथवा नाक्यांवर मुले भीक मागताना दिसतात. यामध्ये विविध प्रकार आहेत. काही मुले अनाथ असल्याने भीक मागतात. काही मुले त्यांच्या परिवारास सोबत असतानाही भीक मागतात. तर काही मुले केवळ पैसे मिळवण्याच्या उद्दिष्टाने भीक मागतात. या सर्व मुलांची या वाईट प्रवृत्तीतून सुटका करून त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी हे अभियान राबवण्यात येणार आहे. या मुलांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासोबतच काही कौशल्य विकासात्मक उपक्रम राबवून रोजगाराभिमुख कसे बनवता येईल याचा विचार करण्यात येत असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details