महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुढील काळात बालगृहातून उज्ज्वल भविष्य घडवण्याचे काम होईल-ॲड यशोमती ठाकूर - News about girls' residential buildings

‘बाल कल्याण नगरी’ या मुलींच्या बालगृह इमारतीचे उद्धाटन अॅड ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना बालगृहातून बालकांचे उज्जवल भविष्य घडवण्याचे कामा झाली पाहिजे असे त्या म्हणाल्या.

Yashomati Thakur inaugurated the girls' residential building in Mumbai
पुढील काळात बालगृहातून उज्ज्वल भविष्य घडवण्याचे काम होईल-ॲड यशोमती ठाकूर

By

Published : Dec 19, 2020, 7:44 PM IST

मुंबई -बालगृहातून बालकांचे उज्जवल भविष्य घडवण्याचे कामा झाले पाहिजे. राज्य शासन यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहे. त्याला अशासकीय स्वयंसेवी संस्थांचेही (एनजीओ) चांगले सहकार्य लाभत आहेमहिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज सांगितले.

चिल्ड्रेन एड सोसायटी संचलित मानखुर्द येथे ‘बाल कल्याण नगरी’ या मुलींच्या बालगृहातील ‘इंटरनॅशनल जस्टीस मिशन’तर्फे (आयजेएम) मुलींच्या निवासी इमारतीचे दुरुस्ती व नूतनीकरण करण्यात आले आहे. या इमारतीचे उद्धाटन अॅड ठाकूर यांच्या हस्ते झाले, यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला कोकण विभागाचे विभागीय उपायुक्त राहूल मोरे, मुंबई उपनगरच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती शोभा शेलार, आयजेएमचे व्हाईस प्रेसिडेंट (दक्षिण आशिया) संजय मकवाना, डायरेक्टर ऑफ आपरेशन्स श्रीमती मेलिसा वालावलकर, चिल्ड्रेन एड सोसायटीचे मुख्याधिकारी विजय क्षीरसागर आदी उपस्थित होते.

मंत्री यशोमती ठाकूर यावेळी म्हणाल्या की, बालकांच्या संरक्षण आणि कल्याणासाठी राज्य शासन नवनवीन उपक्रम पुढील काळात राबवत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे.‘ज्युवेनाईल जस्टीस इन्फर्मेशन सिस्टीम’च्या (जेजेआयएस) च्या डॅशबोर्ड व माहिती व्यवस्थापन पद्धतीद्वारे बालकांची काळजी घेणाऱ्या संस्था, बाल कल्याण समिती, बाल न्याय बोर्ड (जेजेबी) यांचे सनियंत्रण व संबंधित बालकाची नोंद व पाठपुरावा करण्यात येणार आहे. त्यामुळे संरक्षणाची आणि काळजीची गरज असलेल्या बालकांना वेळीच मदत मिळू शकणार आहे.

पुढे ॲड. यशोमती ठाकूर यांनी इमारतीमध्ये निर्माण करण्यात आलेल्या सोयी- सुविधांची पाहणी करुन उत्कृष्ट काम झाल्याबद्दल कौतुक केले. त्यांनी येथील मुलींचीही आस्थेने विचारपूस केली. येथे सुरक्षित वाटते का, जेवण चांगले असते का, निवासाची व्यवस्था चांगली आहे का आदी विचारपूस करुन मुलींच्या समस्या जाणून घेतल्या. ‘आयजेएम’च्या सहकार्यातून इमारत दुरुस्तीचे चांगले काम झाले आहे. इतरही बालगृहांमध्ये अशा सुविधा निर्माण करण्यासाठी अशासकीय स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्यात येईल, असे त्या यावेळी म्हणाल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details