महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Union Budget 2022 : छगन भुजबळ आणि यशोमती ठाकूर यांची अर्थसंकल्पावर टीका, म्हणाले...

महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर( Yashomati Thakur on union budget 2022 ) आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal on union budget 2022 ) यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली.

Yashomati Thakur and Chhagan Bhujbal hits out at modi gov Union Budget 2022
Union Budget 2022

By

Published : Feb 1, 2022, 2:40 PM IST

Updated : Feb 1, 2022, 3:34 PM IST

मुंबई -केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज मोदी सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामण यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा 10 वा अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री सीतारामण यांनी पेपरविना अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्पानंतर विविध मान्यवरांच्या प्रतिक्रिया येत असून काहींनी अर्थसंकल्पावर समाधान व्यक्त केले तर काहींनी टीका केली आहे. महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर( Yashomati Thakur on union budget 2022 ) आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal on union budget 2022 ) यांनी अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली.

अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा, शब्दांची-आकड्यांची आतिषबाजी शिवाय काहीच नाही. जेंडर बजेट बनवण्यात ही हे सरकार अपयशी ठरलंय. महिला बालकल्याणच्या सध्या सुरु असलेल्याच चार योजनांची नावे भाषणात घेऊन स्वतः महिला असलेल्या अर्थमंत्र्यांनी महिला वर्गाची घोर निराशा केली आहे. पगारदार मध्यमवर्गाला आयकरात कुठलीच सूट देण्यात आलेली नाही. कोविड काळात पगारदार तसंच इतर घटकांवर मोठं आर्थिक संकट कोसळलंय, मात्र हा अर्थसंकल्प अशा घटकांना दिलासा देण्यात कमी पडला आहे. अशी प्रतिक्रिया राज्याच्या महिला आणि बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.

एकीकडे देशातील बहुसंख्यांक जनतेचं उत्पन्न घटलेले असताना सरकार मात्र विक्रमी कर वसूली करत आहे. जीएसटीचीं विक्रमी कर वसुली असो किंवा सरकारचं वाढलेले उत्पन्न असो, आपण लोककल्याणकारी राज्याच्या भूमिकेतून टॅक्स टेररिझम कडे जातोय का याच्या आत्मपरिक्षणाची वेळ आलीय, असं वाटतंय. कोविड नंतर सामान्य भारतीयांना दिलासा देण्याची मोठी संधी या सरकारने गमावली आहे, अशी टीका अँड ठाकूर यांनी केली आहे.

तर केंद्राचा अर्थसंकल्प म्हणजे फक्त फुगवलेले आकडे होते. किमान निवडणूक संकल्प म्हणून तरी जनतेला दिलासा देणे गरजेचे होते. केंद्राने फक्तच फुगीर आकडे दाखवले सर्वसामान्यांच्या वाट्याला मात्र भोपळाच आला, या शब्दात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी टीका केली.

कोरोना काळात 4 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या मात्र केंद्राने आजच्या बजेटमध्ये फक्त 60 लाख नोकऱ्यांचे आश्वासन दिले आहे. कोरोनाकाळात तयार झालेली गरीब श्रीमंत दरी कमी करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केला गेला नाही. मागच्या अर्थसंकल्पात विकासदर 11 टक्के पर्यंत दाखवला होता. या अर्थसंकल्पात मात्र 9.2 दाखवला आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनामध्ये अनेक लोकांनी काम केले. त्यामुळे ते टिकू शकले. अनेकांचे त्यावर पोट होते. मात्र, त्याचा उल्लेख सुद्धा या अर्थसंकल्पात नाहीत, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली.

हेही वाचा -Union Budget 2022 Blue Print : कररचनेत कोणताही बदल नाही, क्रिप्टो चलन येणार; वाचा, तुमच्या पदरात काय?

Last Updated : Feb 1, 2022, 3:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details